Download App

Prithvik Pratap: हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापचं अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारं स्वप्न पूर्ण!

  • Written By: Last Updated:

Prithvik Pratap New Home: मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रतापचं अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारं स्वप्न पूर्ण झाल आहे. पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. दमदार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत पृथ्विक चाहत्यांना खळखळवून हसवतो. अगदी कमी वेळात पृथ्विकने मराठी कलाविश्वात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं. अनेक सिरीयलमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवलेल्या पृथ्विकला हास्यजत्रेमुळे लोकप्रियता मिळाली.


पृथ्विकचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावर (social media) कायम सक्रिय असल्याचं बघायला मिळतं. पृथ्विकने नुकतंच मुंबईत त्याच्या स्वत:च्या हक्काचं नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांना यावेळी दिली आहे. पृथ्विकने त्याच्या नवीन घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.

Shahrukh Khan Upcoming Movie : ‘हे’वर्ष शाहरुखचंच... | LetsUpp Marathi

आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा पण एक स्वप्न जे आज पर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं… आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहा च छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं… आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे.ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…! गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबर ला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढ दिवशी त्यामुळे माझी ‘मन्नत’ पुरी झाली अस म्हणायला हरकत नाही. हे घर मिळण्यासाठी अनेकांची निस्वार्थ मदत झाली… त्या प्रेत्यकचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.

Noida Rave Case: ‘अल्विश यादववर कठोर कारवाई करा’, खासदार मेनका गांधीची मागणी

पृथ्विकच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हास्यजत्रेतील कलाकारांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील पृथ्विकच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

Tags

follow us