Noida Rave Case: ‘अल्विश यादववर कठोर कारवाई करा’, खासदार मेनका गांधीची मागणी

Noida Rave Case: ‘अल्विश यादववर कठोर कारवाई करा’, खासदार मेनका गांधीची मागणी

Noida Rave Case: बिग बॉस विजेता एल्विश यादवविरुद्ध नोएडा पोलिसांनी (Noida Police) एफआयआर नोंदवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेनका गांधी यांनी या प्रकरणी एल्विशला लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. एल्विश यादव हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करावी, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. एल्विश यादवने एक व्हिडिओ शेअर करत त्याच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले.


खासदार मेनका गांधी म्हणाल्या की, ‘या संपूर्ण टोळीचा इतक्या लवकर पर्दाफाश केल्याबद्दल मी पोलिसांचे आभार मानते. सध्या या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र एल्विस यादवला अटक होणे अत्यंत गरजेचे आहे. यूट्यूबर एल्विश यादव नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये सापाचे विष आणि जिवंत सापांसह व्हिडिओ शूट करत आहे, आणि त्याच्या टोळीच्या इतर सदस्यांसह आणि बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्या आयोजित करतो. फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, या रेव्ह पार्ट्यांमध्ये विदेशी मुलींना नियमित ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला.

हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पुन्हा एकदा कुस्तीपटूंचे समर्थन केले आणि YouTuber एल्विस यादव यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना लक्ष्य केले आहे.

युपी पोलीसांनी पछाडले जंग-जंग, पण Elvish Yadav ने व्हिडीओद्वारे…

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. 25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असतो. तो नेहमी शॉर्ट फिल्म्स देखील बनवत असतो. ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवड आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube