Download App

Samir Choughule: हास्यजत्रा फेम समीर चौगुलेवर माफी मागण्याची वेळ का आली? म्हणाला, ‘स्किट भोवलं..’

Maharashtrachi Hasyajatra : गेल्या काही वर्षापासून सोनी मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra)या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वेड लावले आहे. प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने कोरोना (Corona) काळामध्ये देखील आपल्याला हसवले आहे. तसेच हास्यजत्रेचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. या कार्यक्रमातील एक महत्वाचा घटक म्हणजे समीर चौगुले (Samir Choughule). समीर केवळ हा अभिनेता नाही तर तो या कार्यक्रमात लेखक म्हणून देखील जबाबदारी बघत आहे.


आजवर त्याने आपल्या लेखणीमधून व अभिनयाने चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत असल्याचा दिसून येत असतो. समीरने साकारलेला शिवालीचा बाबा असो किंवा दाराचा आवाज.. असे त्याने सतत आपल्या अनेक प्रकारच्या कलेची जादू रंगवली आहे. पण आज एका स्किटनं समीर चौगुलेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्याच्यावर अक्षरशः माफी मागण्याची वेळ आली आहे.

समीर चौगुले हास्यजत्रेमध्ये (Maharashtrachi Hasyajatra) काही स्किटच्या दरम्यान तारपा नृत्य करताना दिसून आला होता. तारपा हा आदिवासी समाजाचा लोकनृत्याचा एक प्रकार आहे. बऱ्याचदा विचित्र पद्धतीने ‘तारपा’ करून तो समीर विनोद निर्मिती करत असल्याचे दिसून आला होता. परंतु या नृत्याला समीर चुकीच्या पद्धतीने नाचून, त्या लोकनृत्य प्रकाराची चेष्टा करत असल्याचा आरोप आदिवासी समाजाने यावेळी केला होता. यावरून त्यांनी समीर चौगुलेची भेट घेऊन यावर आक्षेप नोंदवला आहे. एवढेच नाही तर समीरला त्यासंदर्भात माफी देखील मागायला लावली आहे.

Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

एक व्हिडिओ आदिवासी समाजाकडून शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये समीर चौगुले तारपा नृत्य करत असल्याचा दिसून आला आहे. यानंतर आदिवासी समाजातील काही कार्यकर्ते म्हणतात की, ‘आम्ही या प्रकाराचा निषेध करत आहोत. समीर चौगुले आणि त्यानंतर कुणी देखील या नृत्य प्रकारचा अपमान करणार नाही अशी खबरदारी आम्ही घेऊ’, तसेच त्यानंतर समीर चौगुले यासंदर्भामध्ये माफी मागत असल्याचे दिसून येत आहे, त्यावर समीर म्हणतो की, ‘सध्या माझ्या एका प्रहसनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये मी तारपा नृत्य करत असल्याचे दिसून आली आहे, असं सांगितलं होतं, पण तसं मी केलं नाही. जे स्किट मी सादर केलं त्यातून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्व आदिवासी बंधु भगिनींची माफी मागत असल्याचे समीरने यावेळी सांगितले आहे. ‘या झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि असं पुन्हा कधी होणार नाही याची ग्वाही देतो. या स्किट मधून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतु नव्हता आणि कधीही नसतो. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो’ असे समीर यावेळी म्हणाला आहे.

Tags

follow us