Mahesh Manjarekar on Randeep Hudda : अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत येत आहे. त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या चित्रपटातून रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र आता या चित्रपटात एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण चित्रपटाच्या दिग्दर्शनातून महेश मांजरेकर यांनी माघार का घेतली? हे सांगितलं तसेच त्यांनी रणदीप हुड्डावर आरोप देखील केले. (Mahesh Manjarekar Expose Reason behind Setback from Randeep Hudda film Swatantyaveer savarkar)
सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा!, पतीने रचलेल्या कटात भाच्याचीही साथ
काय म्हणाले महेश मांजरेकर?
महेश मांजरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत यावेळी त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चित्रपटाच्या दिग्दर्शनातून महेश मांजरेकर यांनी माघार का घेतली? हे सांगितलं. ते म्हणाले, ‘ रणदीप हुड्डाने सावरकांच्या व्यक्तिरेखेबद्दल केलेल्या संशोधनावर मी प्रभावित झालो होतो. त्यानंतर मी त्याला भेटलो. तो हुशार वाटला. त्याला विषय चांगला समजाला होता. त्याचं स्वातंत्र्य आणि जागतिक युद्धावर चांगल वाचन केलं आहे. पण स्क्रिप्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही डाफ्टमध्ये त्याला सामस्या होत्या. तेव्हा त्याने स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावर कोणताही अडथळा आणणार नाही. असं म्हणटला होता.’
शिवराज्याभिषेक सोहळा कुठे झाला? उत्तरासाठी अहमदनगरच्या शिक्षिकेला घ्यावी लागली लाईफलाईन
‘मात्र त्यानंतर देखील स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावरही तो ढवळाढवळ करत होता. त्याला हिटलर, इंग्लंडचा राजा, पंतप्रधान यांच्या गोष्टी हव्या होत्या. त्यात आमचे मतभेद झाले. त्यानंतर तो शूटींमध्येही ढवळाढवळ करत होता. त्यामुळे हा मला दिग्दर्शन शिकवणार का? असं मला वाटत असताना मी त्याला म्हटलं की, मी माझ्या पद्धतीने दिग्दर्शन करणार. पण तो मला मोकळेपणाने काम करू देत नव्हता. त्यामुळे मी निर्मात्यांना यासंदर्भात सांगितलं आणि चित्रपटातून बाहेर पडलो. आता त्यांना पश्चाताप होत असेल.’
असं म्हणत महेश मांजरेकरांनी या चित्रपटातून आपण का माघार घेतली? तसेच रणदीप हुड्डावर आरोप केले आहेत. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा रणदीपच्या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. टीझरमधील झलक पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. तसेच या सिनेमामधील संवादही उत्तम असणार याची झलक टीझरमध्ये बघायला मिळत आहे. भगत सिंह, सुभाष चंद्र बोस आणि खुदीराम बोस यांसारख्या क्रांतिकारकांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. या सिनेमाचे शूटिंग महाराष्ट्र, अंदमान निकोबार आणि लंडनध्ये झाले आहे. अभिनेता रणदीप हुड्डाचा हा दुसरा बायोपिक आहे. याअगोदर त्याने ‘सरबजीत’ हा बायोपिक केला होता.