सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा!, पतीने रचलेल्या कटात भाच्याचीही साथ

सॅनिटरी पॅडवरून हत्येचा उलगडा!, पतीने रचलेल्या कटात भाच्याचीही साथ

अहमदनगर : गुन्हेगार कितीही अट्टल असला तरीही त्याची एखादी चूक त्याला गजाआड करण्यास पुरेशी असते. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये घडला. एका अज्ञात महिलेचा कातळापूर (ता. अकोले) शिवारात मृतदेह आढळून आला होता. मात्र तिच्या पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅडवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सदर गुन्हा हा मयत महिलेचा पती आणि तिच्या भाच्याने केल्याचे समोर आलं. (Two arrested in Kalyani Mahesh Jadhav murder case husband and niece arrested by police)

पोलीस पथकाने आरोपींना वांबोरीतून ताब्यात घेतले आहे. कल्याणी महेश जाधव (वय 25) असे मयत महिलेचे नाव आहे तर या गुन्ह्याप्रकरणी महिलेचा पती महेश जनार्दन जाधव (वय 31) व भाचा मयुर अशोक साळवे (वय 25) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कातळपुर शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सदर महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला आहे. पोलीस पथकाने घटनास्थळी जात मयत महिलेच्या अंगावरील कपडे, दागिने व घटनास्थळी आढळून आलेले सॅण्डेल, पर्स या आधारे मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.

शिवराज्याभिषेक सोहळा कुठे झाला? उत्तरासाठी अहमदनगरच्या शिक्षिकेला घ्यावी लागली लाईफलाईन 

असा झाला खुनाचा उलगडा
घटनास्थळी आढळून आलेल्या पर्समध्ये वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकीन मिळालं. त्यावर जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वापराकरीता असं लिहिलेलं गुलाबी रंगाचे पाकिट/रॅपर सापडलं. त्यावरुन पथकाने जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकीन हे महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना देवून पुढे अनुसूचित जातीच्या महिलांना दिले जाते अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर पथकाने तातडीने मयत महिलेचा फोटो अंगणवाडी सेविकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रसारीत केला.

तो फोटो पाहून वांबोरी येथून एक फोन एलसीबीच्या अधिकार्‍यांना गेला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलसीबीने वांबोरीतील कल्याणीचे घर गाठले. तिचा पती महेश याच्याकडे चौकशी केली असता कल्याणी 4 ऑगस्टपासून हरवली असून आपण सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता महिलेचा पती महेश जाधव व भाचा मयुर साळवे यांनी दिलेल्या माहितीमध्ये साम्य आढळून आलं नाही.

चारित्र्याच्या संशयावरून केला खून
पथकाने तात्काळ दोघांना ताब्यात घेत खाकीचा हिसका दाखवलाच दोघांनीही संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आरोपी नामे महेश जनार्दन जाधव याने आपला भाचा नामे मयुर अशोक साळवे दोघांनी कल्याणीला भंडारदऱ्याला फिरायला जायचं असं सांगून बाहेर घेऊन गेले आणि तिचा खून केला. कल्याणीच्या चारित्र्याच्या संशयावरुन आपण खून केल्याची कबूली दिल्याने महेश जनार्दन जाधव व मयुर अशोक साळवे यांना अटक करण्यात आली.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube