Download App

Mahesh Manjarekar यांचा ‘जुनं फर्निचर’ लवकरच येणार; दणक्यात पार पडला टिझर लाँच!

Mahesh Manjarekar : दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर ( Mahesh Manjarekar ) यांच्या सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टिझर लाँच करण्यात आला.

Praniti Shinde यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले आमच्या मनात…

यावेळी आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. यतिन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत.

प्रदीप शर्मा यांचेच ‘एन्काउंटर’; अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ ते जन्मठेपेची शिक्षा

महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण ‘जुनं फर्निचर’मध्येही जाणवत आहे. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे, हे कळतेय. टिझरमधील त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवते. मुळात हा आपल्या आजुबाजुला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे ‘ओल्ड फर्निचर’ वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मल्टीस्टारर असलेला हा एका कौटुंबिक चित्रपट दिसतोय.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ”हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली ‘जुनं फर्निचर’ म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना ‘जुनं फर्निचर’बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे. काहींसोबत मी याआधीही काम केले आहे. निर्माते यतिन जाधवसोबतही यापूर्वी मी ‘दे धक्का २’ केला होता. त्यामुळे एकंदरच ही मस्त भट्टी जमून आली आहे.”

follow us