Kay Chukle Saang Naa: ”सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत, यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture) या मराठी सिनेमाची सध्या चांगलीच जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतानाच आता ‘जुनं फर्निचर’ मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘काय चुकले सांग ना ?’ (Kay Chukle Saang Naa ) असे या गाण्याचे बोल असून यांनी वैभव जोशी हे गाणे शब्दबद्ध केले असून डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी संगीत संयोजन केले आहे.
या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांचा आवाज देण्यात आला आहे. (Marathi Song) या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. यामध्ये महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत.
दमदार कलाकारांची फळी असलेला हा मराठी सिनेमा येत्या 26 एप्रिल दिवशी सिनेमागृहात झळकणार आहे.गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात की, ‘या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे गाणे आहे. हे गाणे मला गायला मिळाले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
Taapsee Pannu: बॉयफ्रेंडच्या लग्नानंतर अभिनेत्रीने पहिल्यांदा सोडलं मौन थेटच बोलली
मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. हे गाणे म्हणजे चित्रपटाचा कणा आहे. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.