Mahesh Manjrekar On Trolling: सध्या मनोरंजन (Entertainment) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. कलाकारांना ट्रोल करणं, यामध्ये काही नवीन नाही. परंतु सध्या ट्रोलिंगची पातळी इतकी घसरली आहे की, लोक आता कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील अश्लील भाषेत बोलताना पाहायला मिळत असतात. अनेकवेळा कलाकारांनी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं. परंतु आता ट्रोलर्स त्यांच्या कुटुंबाबद्दल देखील अश्लील भाषेत बोलू लागले आहेत. कुणी कलाकारांच्या कुटुंबाला शिव्या देतं, तर कुणी त्यांच्याविषयी ट्रोलिंग करत असत. या अशा अनेक गोष्टींचा सामना कलाकारांना तर करावा लागतो.
मात्र, या सर्व गोष्टीचा किती मन:स्ताप त्यांच्या कुटुंबाला देखील भोगाव लागतो असतो. अनेक कलाकारांनी अलीकडे ट्रोलिंग विषयी बोलणं सुरू केलं आहे. नुकताच चिन्मय मांडलेकर (Chinmoy Mandalakar) याचा मुद्दा ताजा आहे. आता दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी देखील या मुद्द्यावर थेट वक्तव्य केलं आहे. ‘आई-बहिण, मुली आणि कुटुंबावरून बोलणाऱ्या लोकांना मी शोधून काढून कानफाटावेन’, असं महेश मांजरेकर यांनी खडसावलं आहे.
अभिनेते महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान महेश मांजरेकर अनेक ठिकाणी सिनेमाचे प्रमोशन करण्यात आणि मुलाखती देण्यात व्यस्त आहेत. दरम्यान त्यांनी ट्रोलिंगवर थेट वक्तव्य केलं. सोशल मीडिया वापरताना लोक ज्याप्रकारे त्याचा गैरवापर करत असतात, त्यावर महेश मांजरेकरांनी त्यांना थेट खडेबोल सुनावलं आहे.
Aamir Khan: ‘सीतारे जमीन पर’ सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर! ‘या’ दिवशी सुरू होणार शूटिंग
पुढे महेश मांजरेकर म्हणाले की, ‘मात्र मी एखादी पोस्ट केल्यानंतर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन माझी आई, वडील, मुलगी, बायको किंवा कुटुंबातील इतर कोणाबद्दलही काही बोलण्याचा अधिकार तुम्हाला आजिबात दिलेला नाही. असं कोणी केल्यास चवताळल्यासारखा होऊन, मी त्या व्यक्तीला शोधून काढेन आणि कानाखाली मारेन.’ यावेळी बोलताना असताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीविषयी सोशल मीडियावर अतिशय वाईट लिहिलं जात होतं. मुलीबद्दल इतकं वाईट गोष्टी वाचून संतापलेल्या महेश मांजरेकर यांनी त्या व्यक्तीला शोधून काढलं आणि त्या व्यक्ती विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अशा लोकांना का माफ करावं? या गोष्टी तेव्हा संपतील, जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्याविरोधात एखादा कठोर कायदा तयार केला जाणार आहे, असे यावेळी अभिनेता म्हणाला आहे.