Download App

जीवाची पर्वा न करता…तैमुर खानसाठी ‘ढाल’ बनली सैफची मोलकरीण!

Maid Save Children In Attack On Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Attack On Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाला. यावेळी त्यांच्या मोलकरणीने सैफच्या मुलांना वाचवल्याचं समोर आलंय. मध्यरात्र असल्यामुळं सैफ, करीना कपूर अन् कुटुंबातील इतर व्यक्ती गाढ झोपेत होते. तेव्हा अचानक घरात चोर शिरला. तो नेमका सैफचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये शिरला होता. हे सगळ्यात आधी सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं. मुलांना वाचवण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडू लागली. या चोराला तिने पकडण्याचा प्रयत्न (Bollywood News) केला. यावेळी चोराने तैमूरवर हल्ला केला. पण तिने तो स्वत:च्या हातावर वार झेलला.

Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच…; जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका

या प्रकरणात मुंबई पोलिसांनुसार दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. सर्वात आधी त्याचे घरातील मोलकरणीशी वाद झाले. सैफचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये हा वाद झाला. ते बघून मोलकरणीने आरडाओरड केली, त्यानंतर सैफ जागा झाला. वाद सुरू असल्याचे लक्षात येताच सैफ तिथे आला. त्यावेळी आरोपी आणि सैफमध्ये झटापट झाली. त्याने दोघांच्या वादात मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, तो व्यक्ती सैफवरच भडकला. रागाच्या भरात त्याने हातातील धारदार शस्त्राने सैफवर सपासप वार केले. यावेळी दोघांत झटापट झाली.

सैफवर जीवघेणा हल्ला; हे लोलो…ऑल ओके? खासदार सुप्रिया सुळेंचा थेट करिश्मा कपूरला फोन

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आज मध्यरात्री मुंबईतील वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी आल्याची माहिती मिळतेय. गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर बॉलीवूड स्टार्सपासून ते राजकीय नेते देखील चर्चा करत आहेत. पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानच्या घराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये दोन तास कोणीही येताना किंवा बाहेर जाताना दिसत नव्हते. अशा स्थितीत सैफवर हल्ला करणारा अज्ञात व्यक्ती आधीच घरात बसल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान वडील सैफच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईतील वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले असल्याचं देखील समोर आलंय.

 

follow us