सैफवरील हल्ल्यानंतर काय घडलं?; CCTV फुटेज आलं समोर….

सैफवरील हल्ल्यानंतर काय घडलं?; CCTV फुटेज आलं समोर….

What Happened After Attack On Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूहल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये सैफअली खान गंभीर जखमी झालाय. घरोभोवती चोख सुरक्षा व्यवस्था अन् सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी देखील एक व्यक्ती मारेकरी घरात घुसला. त्याने सैफवर सपासप वार केले. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. सैफवर हल्ला (Attack On Saif Ali Khan) का झाला, नेमकं कारण काय, काय घडलं होतं? या प्रश्नांची उत्तरे अजून गुलदस्त्यातच आहेत. परंतु घटना घडल्यानंतरच एक सीसीटीव्ही फुजेट समोर आलंय.

सैफवरील हल्ल्यानंतर काय घडलं? यासंदर्भात एक CCTV फुटेज समोर आलंय. हे सीसीटीव्ही फुटेज सैफच्या घराबाहेरचं असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, करिनाच्या (Kareena Kapoor) चेहऱ्यावर भीती आहे. ती घरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहे. घरासमोर काही गाड्या आणि एक रिक्षा उभी असलेली दिसत आहे. तर करीना तिच्या घरातील कर्मचाऱ्यांना काहितरी विचारताना दिसत आहे. करीना अतिशय गंभीर अवस्थेत दिसत आहे. ती कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारत आहे. तिच्या हातामध्ये फोन असुन तो देखील सुरू असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.

सैफवर जीवघेणा हल्ला; हे लोलो…ऑल ओके? खासदार सुप्रिया सुळेंचा थेट करिश्मा कपूरला फोन

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की करीना नाईटड्रेसमध्येच आहे. रात्रीची वेळ असून ती तिच्या घरातील कर्मचाऱ्यांसोबत कोणत्यातरी गंभीर विषयावर चर्चा करत आहे. दोन महिला आणि एका पुरूष कर्मचाऱ्यासोबत करीना बोलताना दिसतेय. कदाचित करिना सैफवरील हल्ल्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत असावी. परंतु करीना सैफवरील हल्ल्यानंतर अतिशय घाबरलेली दिसतेय.

अजिंठा वेरुळ चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण एकच प्रश्न उपस्थित होतोय की, हा अज्ञात व्यक्ती नक्की कोण होता? चोर होता की अजून कोण? हा अज्ञात व्यक्ती अचानक घरात कसा काय घुसला? मोलकरणीसोबत वाद घालत असताना सैफ त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे काही वेगळाच वाद होता का? घराभोवती एवढी सुरक्षा असताना हा व्यक्ती घरात घुसला, म्हणजे हा कोणी ओळखीचा व्यक्ती असावा का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

मागील महिन्यात सलमान खानच्या घरावर हल्ला झाला होता. त्यानंतर आता सैफअली खानवर जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता राज्यात कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला झालाय, त्यामुळे सिनेअभिनेत्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सैफअली खानवर सध्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube