Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच…; जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका

  • Written By: Published:
Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच…; जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका

मुंबई : सैफअली खानवर जीवघेण्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ माजलेली असतानाच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मनात मात्र वेगळ्याच शंकांचं काहूर माजलं आहे. याबाबत आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून यात त्यांनी विचार करायला भाग पाडणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. (Jitendra Awhad X Post On Saif Ali Khan Attack )

आव्हाडांची पोस्ट नेमकी काय?

सैफअली खान (Saif Ali Khan) यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक असल्याचे आव्हाडांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

15 दिवसांपूर्वीच मोदींची अन् सैफची भेट; जीवघेण्या हल्ल्यानंतर राऊतांनी काय सांगितलं

वार जिवेमारण्याच्या हेतूनेच

सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे.त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे.त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता,वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या *#पद्श्री* पुरस्काराने सन्मानित आहे.हे विशेष !

हल्ल्यानंतरच सीसीटीव्ही फुजेट समोर

सैफवरील हल्ल्यानंतर काय घडलं? यासंदर्भात एक CCTV फुटेज समोर आलंय. हे सीसीटीव्ही फुटेज सैफच्या घराबाहेरचं असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, करिनाच्या (Kareena Kapoor) चेहऱ्यावर भीती आहे. ती घरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहे. घरासमोर काही गाड्या आणि एक रिक्षा उभी असलेली दिसत आहे. तर करीना तिच्या घरातील कर्मचाऱ्यांना काहितरी विचारताना दिसत आहे. करीना अतिशय गंभीर अवस्थेत दिसत आहे. ती कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारत आहे. तिच्या हातामध्ये फोन असुन तो देखील सुरू असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube