Maidan vs Bade Miyan Chhote Miyan Box Office : ईदच्या मुहूर्तावर जेव्हा-जेव्हा सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तेव्हा सर्वच चित्रपट 100कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, सर्व चित्रपटांची ओपनिंग केवळ 15 कोटींहून अधिक झाली आहे. पण यावेळी ईदच्या मुहूर्तावर अजय देवगण (Ajay Devgn) ‘मैदान’ (Maidan) चित्रपट घेऊन आला आहे आणि अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) हा चित्रपट आणला आहे. एवढ्या मोठ्या प्रसंगी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, मात्र अपेक्षेप्रमाणे या दोन्ही सिनेमाला देखील प्रतिसाद मिळाला नाही. निर्मात्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे चित्रपट चालत नसल्याचे चित्र दिसत आहे.
आज रिलीजचा तिसरा दिवस असून दोन्ही चित्रपटांच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. अजयच्या ‘मैदान’ या चित्रपटाची सुरुवात अतिशय संथ झाली होती. त्याचवेळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’नेही दुसऱ्या दिवशीची कमाई निम्म्यावर पोहोचली आहे. एकीकडे अजयने आपल्या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाद्वारे लोकांसमोर एक नवीन कथा आणली आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या चित्रपटात अनेक नवीन तारे आहेत आणि त्यात मनोरंजन, ॲक्शन, ग्लॅमर आणि कॉमेडी यांचा जबरदस्त मिलाफ पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी ‘मैदान’ची स्थिती कशी होती?
दोन्ही चित्रपट एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. दोघांच्या संकल्पना दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. अशा परिस्थितीत ‘मैदान’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांची तुलना करणे योग्य ठरणार नाही. जर आपण अजय देवगणच्या मैदानाबद्दल बोललो, तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने शुक्रवारी 2.75 कोटींची कमाई केली आहे. जे पहिल्या दिवसाच्या तुलनेत निम्मे आहे. आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 9.85 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.
“मी एकदम व्यवस्थित…”, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडताच अभिनेत्याने दिली हेल्थ अपडेट
‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईत घट
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली होती. पण दुसऱ्याच दिवशीच्या कमाईच्या आकड्यांनी निर्मात्यांची निराशा केली आहे. उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा असताना, तसे झाले नाही. बडे मियाँ छोटे मियाँने आदल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन 55.14 कोटी झाले आहे.