“मी एकदम व्यवस्थित…”, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडताच अभिनेत्याने दिली हेल्थ अपडेट
Sayaji Shinde Health Update : मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे (Sayaji Shinde ) होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो (Real Hero) आहेत. अभिनेत्याच्या छातीत त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साताऱ्यात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्वतः अभिनेत्याने दिली आहे.
View this post on Instagram
सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हणाले की, नमस्कार, मी एकदम व्यवस्थित आहे, (Sayaji Shinde Health) माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असतात, आता काळजी करण्यासारखं काही नाही, लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन धन्यवाद…! अशी पोस्ट स्वतः अभिनेत्याने केली आहे. सयाजी शिंदे यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच त्याचे चाहते काळजीत पडले. त्याच्या उत्तम स्वास्थ्यासाठी ते प्रार्थना करत होते. दरम्यान, आता खुद्द अभिनेत्याने त्याच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे.
डॉक्टर काय म्हणाले…
अभिनेत्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. म्हणाले की, “सयाजींना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीविषयी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे त्यांनी रुटीन म्हणून काही चाचण्या करुन घेतल्या होत्या. आणि त्यामध्ये काहीसे मायनर बदल सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका लहानश्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती दिली.
सिनेइंडस्ट्रीतल्या घराणेशाहीवर पहिल्यांदाच बोलली विद्या बालन, म्हणाली कोणाच्याही बापाची….
सयाजी शिंदे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी-हिंदीसह कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी सिने-निर्मितीही केली आहे. सयाजी शिंदे अभिनेते असण्यासोबत वृक्षप्रेमीदेखील आहेत. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या गाजलेल्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आहे. आता त्यांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. सयाजी शिंदेनी झाडे लावण्याचा आणि वृक्षतोड रोखण्याचा विडा उचलला आहे. ते सतत झाडे लावा, झाडे जगवा अशा उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करत असतात.