Main ATAL Hoon: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचे अभिनेते आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिकांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप पाडली. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. या सिनेमात त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
काँग्रेसमध्ये खिंडार? अनुराधा नागवडेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीसमोर पेच
या दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी अटबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीला का निवडलं? याचं एक गुपित शेअर केलं आहे. ते म्हणाले की, निर्माते जेव्हा चित्रपट बनवण्यासाठी माझ्याकडे आले तेव्हा माझ्या डोक्यात लगेच अटबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीचं आला. कारण त्या दोघांच्या आयुष्यात अनेक साम्य आहे.
राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज; विखेंचा हल्लाबोल
अटलबिहारींप्रमाणेच पंकज देखील एका छोट्या शहरातून आला आहे. प्रचंड यश मिळवलं आहे. अटलबिहारींनी देशाला दिशा दिली. तशीच पंकजने अभिनयाला. तसेच त्याचे व्यक्तिमत्व पारदर्शक आहे. त्यामुळे अटबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीला निवडलं. तसेच त्याचा पहिला लूक आला तेव्हा आम्हाला आमचा निर्णय 100 टक्के पटला. असं रवी जाधव यांनी सांगितलं.
एका दमदार कलाकारांच्या सहकार्याने बनलेला हा चित्रपट लवकरच म्हणजे 19 जानेवारी 2024 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रोडक्शन, ‘मैं अटल हूं’ ची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी केली आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित आणि ऋषी विरमानी निर्मित या अभिनेत्याने चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रेम दिले आहे.