राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज; विखेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : आपल्या वक्तव्यामुळं आणि आरोप प्रत्यारोपांमुळे कायम चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital)दाखल करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मंत्री विखे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? पुरस्कारासाठी नामांकने जाहीर
नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.
Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण केल्याने प्रचंड ट्रोल !
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती, त्यावर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
यावेळी मंत्री विखे म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. लवकरच त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. राऊत यांनी आजवर अनेक लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सहभाग घेत त्यांची आयुष्य उध्वस्त केली. याची यादी मी जाहीर करतो, असेही मंत्री विखे म्हणाले.
यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक आरोप केले. पण राजकारणामध्ये काही पथ्य पाळायला हवी, ती आपण पाळली होती. स्वर्गीय माधव गडकरी हयात असते तर त्यांनी देखील हेच सांगितलं असतं, असेही यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.