काँग्रेसमध्ये खिंडार? अनुराधा नागवडेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीसमोर पेच

काँग्रेसमध्ये खिंडार? अनुराधा नागवडेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीसमोर पेच

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले असतानाच त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नागवडे दांपत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय खुले असून निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात नगर जिल्ह्यातील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

KGF फेम यशचा वाढदिवस चाहत्यांना पडला महागात; सेलिब्रेशनच्या तयारीत तिघांचा मृत्यू

2014 चा अपवाद वगळता श्रीगोंदा विधानसभेचे प्रतिनिधित्व जेष्ठनेते बबनराव पाचपुते यांनी केले आहे. शरद पवार हेच माझे विठ्ठल म्हणणारे पाचपुते 2019 ला भाजप कडून आमदार झाले. 2014 विधानसभेला भाजपात गेलेल्या पाचपुतेंचा राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी धक्कादायक पराभव केला. राहुल जगतापांच्या विजयात काँग्रेसचे दिवंगत शिवाजी नागवडे यांचा मोठा हातभार राहिला तो शरद पवार यांच्यामुळे. मात्र, आता आमदार पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप यांच्यासमोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच, असे घोषित केल्याने महाविकास आघाडीसमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

Prakash Shendage : ‘तुमच्याकडे आंदोलनासाठी 10 लाख गाड्या, तर आमच्याकडे 2 हजार गाढवं-मेंढरं’

काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा असलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. एकाच घरात काँग्रेस पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पद असताना नागवडे दाम्पत्य काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडाच्या तयारीत आहे. नागवडेंच्या या स्पष्ट भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांपूढे आता उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

‘नाट्यगृहांसाठी भरीव निधी, सरकारकडं निधीची कमतरता नाही’; सुधीर मुनगंटीवारांनी ठणकावून सांगितलं

नागवडेंसमोर हा पर्याय ठरू शकतो…
दरम्यान, श्रीगोंद्याची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असून माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. अशात काँग्रेसकडून नागवडे परिवारात जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात कॉंग्रेसकडे जागा खेचून आणणार का? हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे येत्या 19 जानेवारी रोजी माजी आमदार दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांचा जयंती कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याने नागवडेंच्या समोर असलेल्या पर्यायातला एक पर्याय राष्ट्रवादी अजित पवार गट असू शकतो असे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube