‘नाट्यगृहांसाठी भरीव निधी, सरकारकडं निधीची कमतरता नाही’; सुधीर मुनगंटीवारांनी ठणकावून सांगितलं
Sudhir Mungantivar : राज्यात 75 नाट्यगृहांसाठी भरीव निधी देण्यात आला असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधीची कमतरता नसल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी विरोधकांना सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारकडे निधी नाही, देशावर कर्ज असल्याचा सूर लावण्यात आला होता. विरोधकांच्या या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. पुण्यात आज 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडलं. यावेळी मुनगंटीवार बोलत होते.
एमटीएचएल पाठोपाठ जानेवारीत कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार, CM शिदेंची घोषणा#EknathShinde #CoastalRoad #MumbaiTransHarborLinkhttps://t.co/qz0BpiJr9W
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 7, 2024
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आत्तापर्यंत राज्यात नाट्यगृहांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारकडून भरीव निधी देण्यात आलेला आहे. राज्यात 75 नाट्यगृहे तयार होणार आहेत. त्यासाठी सरकारकडे निधीची कमतरता नाहीये, राज्यात 75 नाट्यगृहांची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमच्यातील कोणीही पद सोडणार नसल्याचं आश्वासनच सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
साध्या गोष्टींमध्येही नाविन्य आणतात… : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून गुजरातींचे तोंडभरुन कौतुक
या संमेलनात मान्यवरांनी राजकीय नेते उत्तम नाटकं करीत असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आम्ही नाट्यरसिक आहोत, इथपर्यंत आम्हाला माहित होतं. पण तुम्ही आम्हीसुद्धा उत्तम नाटकं करतो असं म्हटलंय. आता हे आमचं कौतूक होतं की, विटंबना हे आम्हाला समजलं नाही. आम्ही नाटकं करतो पण तुम्ही नाटक क्षेत्रात एवढं राजकारण करतात की आम्ही मागे पडतो, हे काही लोकांनी कानात सांगितल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना उद्देशून म्हणाले आहेत.
‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?
दरम्यान, राज्यातील नाट्यगृहांसाठी राज्य सरकारने भरीव निधी दिला आहे. राज्य सरकारकडे निधीची कमतरता नसून महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला जीएसटीमार्फत 16 टक्के दिले जातात. म्हणूनच म्हणतो की, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला जातात तेव्हा कार्यकर्त्यांकडून तुम आगे बढो, असे नारे देतात, पण आज मी सांगतो, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं आश्वासनच मुनगंटीवारांनी नाट्यसंमेलनातील रसिकांना दिलं आहे.