KGF फेम यशचा वाढदिवस चाहत्यांना पडला महागात; सेलिब्रेशनच्या तयारीत तिघांचा मृत्यू

KGF फेम यशचा वाढदिवस चाहत्यांना पडला महागात; सेलिब्रेशनच्या तयारीत तिघांचा मृत्यू

KGF : केजीएफ (KGF) फेम रॉकीभाई म्हणजेच कन्नड सुपरस्टार यश. याचा आज 38 वा वाढदिवस आहे. मात्र हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांच्या जीवावर बेतला आहे. कारण या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करताना विजेच्या धक्क्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत.

Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण केल्याने प्रचंड ट्रोल !

त्याचं झालं असं की, कर्नाटकातील गडग जिल्ह्यामध्ये अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी यशचं भलं मोठं कट आउट लावण्यात येणार होतं. हेच कट आउट लावताना तीन तरुण चाहत्यांना विजेचा शॉक बसला. दुर्दैवाने या तिघांचाही यामध्ये मृत्यू झाला असून आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

PM Modi यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना; प्लॅटफॉर्म सर्चमध्ये 3,400 टक्क्यांनी वाढ

त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करणे या तरुणांना चांगलंच महागात पडल्याचे दिसून येते. यशच्या सिनेप्रवासाबद्दल सांगायचं झालं तर यश खरं नाव नवीन कुमार गौडा असं आहे. 2007 मध्ये त्याने ‘Jambada Hudugi’ या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर हिंदीत आलेल्या केजीएफ चॅप्टर 1 या चित्रपटातून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर आलेल्या केजीएफ चॅप्टर 2 ने देखील चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर आता यशचा टॉक्सिक हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दहा एप्रिल 2025 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

दरम्यान‘केजीएफ’ फेम अभिनेता यश (Yash ) याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ (Rocky Bhai) या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आता आगामी सिनेमाचे नाव ‘टॉक्सिक’ (Toxic Movie) असे आहे. निर्मात्यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करुन त्याच्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. आणि रिलीज डेटही सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज