Download App

Main Atal Hoon: मुंबईमध्ये पूर्ण झालं रवी जाधव अन् पंकज त्रिपाठीच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण!

Atal Bihari Vajpayee: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi’) यांच्या ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासून, (Bhanushali Studios Limited) देशाचे लाडके माझी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देणारी आणि रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित आणि ऋषी विरमानी निर्मित या अभिनेत्याने चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रेम दिले आहे.


रवी जाधव यांनी वाजपेयी यांच्या जीवनावर लिहिलेल्या सिनेमॅटिक मास्टरपीसचा एक अनुभव घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. लखनौच्या शूटिंग शेड्यूल दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. आणि चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चा झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

आज या चित्रपटाचे मुंबईत शेवटचे शुटिंग पूर्ण झाले आहे. मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनौ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ४५ दिवसांहून अधिक काळ चित्रीत करण्यात आला आहे. हा चित्रपट अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणीचा आणि असाधारण राजकीय प्रवासात घेऊन जाणारा आहे.

एका दमदार कलाकारांच्या सहकार्याने बनलेला हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रोडक्शन, ‘मैं अटल हूं’ ची निर्मिती विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान आणि कमलेश भानुशाली यांनी केली आहे.

Tags

follow us