Download App

‘नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करणार’; मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ ट्रेलरला तुफान प्रतिसाद

Chhapa Kaata Trailer: अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांची जोडी असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ (Chhapa Kata) मराठी सिनेमाचं पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळाला होता. (Marathi Movie) सिनेमाच्या विलक्षण पोस्टरनंतर 24 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांचा चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ मराठी सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे आणि या ट्रेलरला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘छापा काटा’ मराठी सिनेमा 15 डिसेंबर 2024 दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. शूटिंग गौरव पोंक्षे, बिजनेस हेड अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत.

‘छापा काटा’ मराठी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून मोठा विनोदी गोंधळ घालत असल्याचे दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या कलाकारांची मुख्य भूमिका असणार आहे.

Box Office Collection: पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ नं केला 100 कोटींचा आकडा पार!

या धमाकेदार ट्रेलर सोबतच प्रत्येक चाहत्यांच्या मनाला प्रेमाचा ओलावा देणारं सिनेमातील ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ हे गाणं रिलीज करण्यात आले असून गाण्याला संपूर्ण राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. गाण्याला अभय जोधपुरकर आणि आर्या आंबेकर यांनी आपले स्वर दिले असून गौरव चाटी, गणेश सुर्वे आणि मुकुल काशीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक चाहत्याला त्याच्या आवडीचं मनोरंजन अनुभवता येण्यासाठी आम्ही ‘छापा काटा’ सारखा संपूर्ण धमाल विनोदी मनोरंजन असणारा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. नुकताच रिलीज झालेला धम्मकेदार ट्रेलर आणि गाण्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद पाहून सिनेमालाही जोरदार प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा आहे.

Tags

follow us