हेअर ऑयलची ब्रॅन्ड अॅंबॅसिडर होतं अलियाकडून शिक्षणाचा संदेश

मॅरिकोच्या निहार शांति आमला या हेअर ऑयलने अभिनेत्री आलिया भटला आपलं ब्रॅन्ड अॅंबॅसिडर केलं आहे. त्यामध्ये तिने शिक्षणाविषयी आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी संदेश दिला आहे.

या जाहिरातीमध्ये आलिया शिक्षिकेच्या भूमिकेत दाखवली आहे. तर तिच्या केसांमुळे तिचे विद्यार्थी तिचं कौतुक करतात. तर 'बाल बढेंगे, बच्चे पढेंगे' या ओळींनी या जाहिरातीची सांगता होते.

या जाहिरातीमध्ये आलिया अत्यंत आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. तिने आकाशी आणि पिस्ता शेडकडे जाणाऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला यामध्ये पाहायाला मिळत आहे.

तर या अगोदर या तेलाच्या जाहिराती अनेक अभिनेत्रीं केल्या आहेत. त्यामध्ये अभिनेत्री विद्या बालनने देखील या तेलाच्या जाहिरातीच्या माध्यमातून शैक्षणिक संदेश दिला होता.
