Malaika Arora: मलायकाला ‘बदकासारखी चाल’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली…

Malaika Arora: मलायका अरोरा (Malaika Arora ) आपल्या अभिनयापेक्षा तिची वक्तव्ये आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसचे मोठे चाहते आहेत. यामुळे तिचे जिमबाहेरील आणि योगा स्टुडिओ बाहेरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होत असतात. अनेकवेळा तिच्या चालण्याच्या स्टाइलवरून (Style) चाहते तिला नेहमी ट्रोल (trolling ) करत असतात. एकदा तर राखी सावंतने (Rakhi […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T105242.406

Malaika Arora

Malaika Arora: मलायका अरोरा (Malaika Arora ) आपल्या अभिनयापेक्षा तिची वक्तव्ये आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसचे मोठे चाहते आहेत. यामुळे तिचे जिमबाहेरील आणि योगा स्टुडिओ बाहेरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होत असतात. अनेकवेळा तिच्या चालण्याच्या स्टाइलवरून (Style) चाहते तिला नेहमी ट्रोल (trolling ) करत असतात. एकदा तर राखी सावंतने (Rakhi Sawant) देखील तिच्या ‘डक वॉक’ म्हणजेच बदकासारख्या चालीची खिल्ली उडवली होती.


मलायका अरोराने पहिल्यांदा तिच्या चालीवरून उडणाऱ्या खिल्लीविषयी भाष्य केले आहे. ‘मुव्हिंग इन विथ मलायका’च्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने स्टँडअप कॉमेडी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिने ट्रोल्सना चांगलाच प्रत्युत्तर दिले होते. अर्जुन कपूरशी असलेल्या नात्याविषयी देखील मलायका अरोराने तिच्या प्रसिद्ध डक वॉकवरही प्रतिक्रिया दिली होती.

मलायका अरोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, माझ्याजवळ घट्ट नितंब आहेत, ज्यावर मी ७ वेळचे जेवण वाढू शकते, तर मी बदकाप्रमाणे का चालू शकत नाही? खरं तर मी बदक, मांजर, चित्ता यांच्यासारखं चालू शकते. यावेळी तिने अरबाज खान आणि तिच्या घटस्फोटाविषयी बोलणाऱ्यांना देखील चांगलच सुनावले आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

घटस्फोटित शब्दाचा उल्लेख करत म्हणाली की, ती केवळ घटस्फोटित नाही तर एक उद्योजिका आणि आई देखील आहे. परंतु लोक तिला नेहमी आठवण करून देत असतात की, ती घटस्फोटित आहे. ती आणि अरबाज आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत, मग बाकीचे सगळे कधी पुढे जाणार? असा सवाल ती विचारत असलयाचे देखील दिसून येत आहे.

Exit mobile version