Malaika Arora दुसऱ्यांदा लग्न करणार का? म्हणाली, मी लग्नाबद्दल विचार केला आहे, पण….’

Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांची मने जिंकते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बरोबरच्या नात्यामुळे मलायका ही कायमच बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.   View this post on Instagram   A […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T175319.239

Malaika Arora on Second Marriage

Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांची मने जिंकते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बरोबरच्या नात्यामुळे मलायका ही कायमच बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.


मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी गेल्या वर्षांअगोदर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्यांदा लग्न करणार की नाही? याविषयी तिने एका विशेष मुलाखतीत मलायकाने स्पष्ट केले आहे. दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या निर्णयाविषयी मलयाकाने सांगितले आहे, ‘हो, मी याबद्दल विचार करत आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मी पुन्हा लग्न केव्हा करणार याचे उत्तर मला लगेचच देता येणार असल्याचे तिने यावेळी सांगितले, कारण मला काही गोष्टींविषयी चाहत्यांना सरप्राईज द्यायचं आहे.

मलायका पुढे म्हणाले, सगळ्या गोष्टी अगोदरच सांगितल्याने त्यामध्ये काही मजा राहणार नाही. मी लहान होते, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की नातं हे झाडाच्या रोपासारखं असतं. तुम्ही बी पेरता आणि ते वाढण्याकरिता तुम्हाला पाणी द्यावे लागते. काही नाती वेगळी असतात, तुम्ही शॉर्टकटचा वापर करु शकत नाही. एकमेकांना समजून घेणे आणि त्यांचे कौतुक करणे हेच खूप महत्वाचे ठरणार आहे. हे अनेकवेळा आपण विसरत असतो.

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, ‘…मार खाणार’

मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत असते. मलायकाच्या सोशल मीडियावर पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेतात. तिला इन्स्टाग्रामवर १७ मिलियनवर फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या अनेक हॉट लूकमधील फोटो देखील शेअर करते. 1998 मध्ये अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले होते.

२०१७ मध्ये मलायका आणि अभिनेता अरबाज खानचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याची माहिती मिळत आहे. मलायका आणि अर्जुन हे दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मलायका ही ४८ वयाची आहे, तर अर्जुन ३६ वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेकवेळा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाते.

Exit mobile version