Malaika Arora Rumor Boyfriend: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते. कधी तिच्या बोल्ड फोटोमुळे तर कधी तिच्या रेलेशनशिपमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या ब्रेकअपच्या अफवा सुरु आहे. मात्र, दोघांनीही अद्याप या ब्रेकअपला दुजोरा दिलेला नाही.
तर दुसरीकडे मलायका मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीला मलायकाचा रुमेड बॉयफ्रेंड असल्याचा म्हटलं जात आहे. याच बरोबर मलायकाने एक स्टोरी देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामुळे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या अफवा सोशल मीडियावर सुरु झाले आहे.
मलायकाने नेहमी इन्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत रोजचे अपडेट्स शेअर करत असते. ती काय खाते, काय विचार करते याबाबात ती तिच्या पोस्टमधून चाहत्यांना माहिती देत असते. सध्या तिच्या नवीन स्टोरीमध्ये तिने लिहिले आहे की, “प्रत्येक सूर्योदय तुम्हाला एका नवीन दिवसाबद्दल सांगतो. हे तुम्हाला सांगते की तुमच्याकडे सकारात्मकता आणि शक्यता भरण्यासाठी आणखी एक नवीन दिवस आहे.” मलायकाच्या या स्टोरीमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या स्टोरीवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, मलायका, आता तू तुझ्या आयुष्यात पुढे गेली आहेस असे वाटते. दुसऱ्याने लिहिले, “तुम्ही आणि अर्जुन एकत्र चांगले दिसता.” तिसऱ्याने लिहिले, “तुम्ही तुमच्या आयुष्यात खरोखरच पुढे गेला आहात का?” असं यूजर्स सोशल मीडियावर लिहीत आहे.
Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्वल रेवण्णाविरोधात 2 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
अरबाज खानपासून घेतला होता घटस्फोट
अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानशी मलायका अरोराने लग्न केले होते परंतु 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. त्याच्या वैयक्तिक आयुष्याची झलक त्याच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि सार्वजनिक देखाव्यामध्ये देखील दिसू शकते.