Download App

ड्रग्जच्या नशेत ‘त्या’ अभिनेत्याने माझा ड्रेस…अभिनेत्री विंसी अलोशियसचा धक्कादायक खुलासा

एका चित्रपटात काम करताना मला मुख्य अभिनेत्यासोबत हा अनुभव आला. त्याने ड्रग्जची नशा केली होती आणि अत्यंत चुकीच्या

  • Written By: Last Updated:

Malayalam actress Vinci Aloysius : इंडस्ट्री कोणतीही असली तरी ड्रग्जशी संबंधित बातम्या समोर येतच असतात. नुकतंच एका मल्याळम अभिनेत्रीने विंसी अलोशियसने सेलिब्रिटींच्या ड्रग्ज सेवनाबद्दल धक्कादायक खुलासा केला. (actress ) तसंच, ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कलाकारांसोबत कधीच काम करणार नसल्याचं तिने जाहीर केलंय. याबद्दल सांगताना विंसीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली.

एका चित्रपटात काम करताना मला मुख्य अभिनेत्यासोबत हा अनुभव आला. त्याने ड्रग्जची नशा केली होती आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने तो माझ्याशी वागला होता. त्यामुळे त्याच्यासोबत पुढे काम करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. जेव्हा माझ्या ड्रेसची समस्या होती आणि मला ते दुरुस्त करायचं होतं. तेव्हा त्याला माझ्यासोबत यायचं होतं. मी तुला तयार व्हायला मदत करतो, असं तो सेटवर सर्वांसमोर म्हणाला. त्यानंतर सेटवरील वातावरण खूप अन्कम्फर्टेबल झालं होतं.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवानी; आशिष शेलार यांची घोषणा

एका सीनच्या सरावादरम्यान त्याच्या तोंडातून काहीतरी पांढरा पदार्थ टेबलावर पडला होता. त्यामुळे तो सेटवर ड्रग्जचं सेवन करत होता, हे स्पष्ट झालं होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे सेटवरील अनेकांसाठी समस्या निर्माण झाली होती. खासगी आयुष्यात ड्रग्ज वापरणं ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा त्या गोष्टींचा तुमच्या कामावर आणि कामावरील इतर माणसांवर परिणाम होतो, तेव्हा ते अस्वीकार्य आहे, असं विंसीने स्पष्ट केलं.

अशा घटनांमुळेच कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं म्हणून तिने ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांसोबत काम करणार नसल्याचं म्हटलंय. मला अशा पद्धतीने काम करायचं नाही. एखाद्याला आपल्या वागण्याने इतरांवर काय परिणाम होतोय याचीही जाणीव नसेल, तर त्या व्यक्तीसोबत मला काम करायचं नाही. हा निर्णय मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून घेतला आहे, असं विंसी पुढे म्हणाली.

follow us

संबंधित बातम्या