Download App

कायदेशीर कारवाई करणार, मल्लिका ढसाळांचा इशारा, ‘चल हल्लाबोल’ चित्रपटाचा वाद पेटला

Namdev Dhasal : दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणणारे आणि गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथर सारखी चळवळ सुरु

  • Written By: Last Updated:

Namdev Dhasal : दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणणारे आणि गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथर सारखी चळवळ सुरु करणारे नामदेव ढसाळ यांचा जीवनावर आधारित ‘चल हल्लाबोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली असून सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली आहे. तसेच ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असा सवाल सेन्सॉर बोर्डाने नोटीसमध्ये विचारल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे ‘चल हल्ला बोल’ (Chal Hala Bol) सिनेमा माझ्या परवानगीशिवाय तयार करण्यात आला आहे. मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मल्लिका ढसाळ (Mallika Dhasal) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी संजय पांडे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांवर बातमी सुरु आहे की, महेश बनसोडे नावाच्या व्यक्तीने ‘चल हल्लाबोल’ नावाचा एक सिनेमा बनवला आहे आणि हा सिनेमा नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर आधारित आहे. या चित्रपटात त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा वापर केला आहे असं सेन्सॉर बोर्डाच्या नोटीसामध्ये नमूद आहे. या चित्रपटावरून महेश बनसोडे आणि सेन्सॉर बोर्डामध्ये वाद निर्माण झाले आहे. असं बायोस्कोप फिल्म्सचे निर्माते संजय पांडे म्हणाले. तसेच डोके फिरू सेन्सर बोर्डच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी केली. याचबरोबर थोर पुरुषांचा अपमान टाळण्यासाठी मराठी सिनेमा सेन्सॉर बोर्डवर योग्य व्यक्ती असावे. ज्यांना मराठी भाषेचा सन्मान असला पाहिजे. मराठी भाषेची जाणीव असेल अश्या व्यक्तीची नियुक्ती मराठी सेन्सर बोर्डवर करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना संजय पांडे म्हणाले की, आम्ही नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळकडून सर्व राईट्स घेतले आहे तसेच या चित्रपटासाठी गेल्या तीन वर्षांपासून आम्ही रिचर्स करत आहोत. आम्ही नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर सिनेमा बनवत आहोत याची सर्वांना माहिती आहे. तर महेश बनसोडे यांनी कोणतीही परवानगी मल्लिका ढसाळ यांच्याकडून घेतली नाही. आम्ही मल्लिका ताई यांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत अशी माहिती माध्यमांशी बोलताना बायोस्कोप फिल्म्सचे निर्माते संजय पांडे यांनी दिली.

मराठीचा अपमान आहे : मल्लिका ढसाळ

तर या पत्रकार परिषदेमध्ये मल्लिका ढसाळ म्हणाल्या की, इतकी भयंकर वेळ माझ्यावर आली आहे. हे अत्यंत यातनादायी आहे. हे मराठीचा अपमान आहे. ज्यांनी मराठीचा झेंडा जगात लावला आहे. तो माणूस कोण आहे? असं कसा विचारू शकतात. त्या माणसाचे तातडीने निलंबन करावे. अशी मागणी मल्लिका ढसाळ यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली.

वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट असेल तर कारवाई करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे स्पष्टच बोलले

तसेच ‘चल हल्ला बोल’ सिनेमा माझ्या परवानगीशिवाय तयार करण्यात आला आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्या आहेत. मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये मल्लिका ढसाळ म्हणाल्या.

follow us