मोठी बातमी, नवीन नावाने ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘मनाचे श्लोक’ चित्रपट

Manache Shlok : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट मनाचे श्लोक चर्चेत आहे.

Manache Shlok

Manache Shlok

Manache Shlok : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट मनाचे श्लोक चर्चेत आहे. या चित्रपटाच्या र्शीर्षकावरुन हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शीर्षकामुळे धार्मिक भावना दुखावल्याने चित्रपटाला बंदी घालण्याती यावी अशी मागणी अनेक हिंदुत्वादी संघटनांकडून होत आहे. मात्र आता मनाचे श्लोक नव्या नावाने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. याबाबत निर्मात्यांनी माहिती दिली आहे.

चित्रपट पाहताना प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच सार्वजनिक मालमत्ता किंवा चित्रपटगृहांचे नुकसान टाळता यावे यासाठी निर्मत्यांनी या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेताल आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाचे श्लोक आता 16 ऑक्टोबर रोजी ‘तू बोल ना’ या नावाने संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे.

याबाबत चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव (Shreyash Jadhav) आणि संजय दावरा (Sanjay Davra) यांनी सांगितले की, गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते परंतु रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमे आणि हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीने आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा दिला हे पाळबळ आमच्यासाठी खूप मोलाचे होते असं निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी सांगितले. तसेच या पाठिंब्यामुळेच नव्या नावाने चित्रपट पुन्हा (Manache Shlok) प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

कंपनी असावी तर अशी! दिवाळीची 9 दिवस सुट्टी, अट एकच येताना दोन किलो वजन अन् दहापट अधिक आनंदी होऊन या…

नेमकं प्रकरण काय?

मनाचे श्लोक चित्रपट संपूर्ण राज्यात शुक्रवारी प्रदर्शित झाला होता मात्र पहिल्याच दिवशी पुणे, संभाजीनगरसह राज्यातील इतर भागात काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी चित्रपट बंद पाडले तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. यानंतर निर्मात्यांनी मोठी निर्णय घेत चित्रपट थांबवले होते. मात्र 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा नवीन नावाने चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

Exit mobile version