मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव वादाच्या भोवऱ्यात! सज्जनगडमधील श्रीसमर्थ सेवा मंडळाचा विरोध

सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने 'मनाचे श्लोक' या आगामी चित्रपटाच्या टायटलला विरोध दर्शविला आहे.

Shri Samarth Seva Mandal Sajjangad

Manache Shlok Film Name Controversy : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने ‘मनाचे श्लोक’ या आगामी चित्रपटाच्या टायटलला विरोध दर्शविला आहे. या वादामुळे ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या टायटलच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चित्रपटात नेमकं काय?

आयुष्य हे (Manache Shlok) एक प्रवास आहे, कधी सहज, कधी कठीण, तर कधी भावना आणि अनुभवांनी (Marathi Film) भरलेले. जर या प्रवासाला पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची उब मिळाली, तर तो प्रवास अविस्मरणीय ठरतो. अशाच एका खास प्रवासाची कथा प्रेक्षकांना ‘मना चे श्लोक’ या चित्रपटातून (Entertainment News) पाहायला मिळणार आहे.

उत्सुकता वाढवणाऱ्या गोष्टी

चित्रपटाची कथा मनवा आणि श्लोक या दोन पात्रांच्या प्रवासाभोवती केंद्रित ( Shri Samarth Seva Mandal Sajjangad) आहे. त्यांच्या नात्यांचे बंधन, विचार आणि स्वप्नांचा सुंदर संगम या चित्रपटात दिसून येतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ते दोघे पर्वतांच्या दिशेने पाऊल टाकताना दाखवले गेले आहेत. हे दृश्य त्यांच्या प्रवासाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढवत आहे.

प्रेक्षकांसाठी प्रश्न असा राहतो की, या प्रवासात मनवा आणि श्लोक यांचे प्रेम फुलणार का? त्यांच्या सोबत कोण असेल? त्यांनी मागे काय ठेवले आहे? आणि डोंगर त्यांना कोणत्या नव्या मार्गावर घेऊन जात आहेत? या सर्व गोष्टी प्रेक्षकांसाठी रोमांचक आणि उत्सुकता वाढवणाऱ्या ठरणार आहेत.

प्रेक्षकांसमोर कधी येणार?

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट 10 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे, तर निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

follow us