Manache Shlok : ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेत 110 विद्यार्थी विजयी
Manache Shlok : समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) पुणे

Manache Shlok : समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) पुणे (Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा 2025 चे पारितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले. या स्पर्धेत 110 विद्यार्थी विजयी झाले.
पुण्यातील 28 शाळांमधील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यातून 680 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडली गेले व त्यामधील 110 विद्यार्थी विजयी झाले. या स्पर्धेत नर्सरी ते दहावी असे गट तयार करण्यात आले होते, यासोबतच शिक्षक आणि पालक यांच्यासाठी देखील ही स्पर्धा होती.
प्रवाशांना मोठा ‘धक्का’, ST बसची भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या नवीन दर
या पारितोषक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, समर्थ भारत अभियानाचे डॉ. राजीव नगरकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता तोडकर यांनी केले.