प्रवाशांना मोठा ‘धक्का’, ST बसची भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या नवीन दर

  • Written By: Published:
प्रवाशांना मोठा ‘धक्का’, ST बसची भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या नवीन दर

ST Bus Rate Hike : महायुती सरकारने (Mahayuti Government) मोठा निर्णय घेत सर्व प्रकारच्या एसटी बस (ST Bus Rate Hike) प्रवासाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दरदिवशी वाढत असणाऱ्या महागाईत सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने 14.95 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवनेरी (Shivneri) , शिवशाहीसह (Shivshahi) लालपरीच्या प्रवासाच्या दरात वाढ होणार आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी महामंडळाने 18 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता महामंडाळाने 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, नविन भाडेवाढ 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

दुसऱ्यांदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व विभागांना 100 दिवसांचे नियोजन करून सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने तिकीट दारात 14.95 टक्के भाडेवाढ करणे आणि पहिल्या चार महिन्यात 20 चार्जिंग स्टेशन तयार करणे तसेच स्वमालकीच्या 5 हजार नव्या बस खरेदी करणे असे मुद्दे मांडले होते. त्यानुसार आता भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

जाणून घ्या नवीन दर

जुने दर                                                                       नवीन दर

साधी बस : 8.70 रुपये प्रति टप्पा 6 किमी :                11 रुपये प्रति टप्पा 6 किमीसाठी

जलद सेवा (साधारण) – 8.70 रुपये          :                  11 रुपये रात्र सेवा

(साधारण बस) – 8.70 रुपये                     :                 11 रुपये

निम आराम – 11.85 रुपये                           :               15 रुपये

विनावातानुकूलीत शयन आसनी – 11.85 रुपये  :         15  रुपये

विनावातानुकूलीत शयन शयनयान – 11.85 रुपये :     16 रुपये

शिवशाही – वातानुकूलीत – 12.35 रुपये               :     16 रुपये

जनशिवनेरी (वातानुकूलीत) 12.95 रुपये                :   17 रुपये

शिवनेरी ( वातानुकूलीत) – 18.50 रुपये                  :  23 रुपये

शिवनेरी स्लिपर ( वातानुकूलीत) – 22 रुपये             :  28 रुपये

ई बस 09 मिटर ( वातानुकूलीत) – 12 रुपये          :     15 रुपये

ई-शिवाई/ई बस 12 मिटर ( वातानुकूलीत) – 13.20 रुपये :  17 रुपये

ND स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी शालेय विद्यार्थांचा कलाविष्कार, फिल्मसिटीने जोपासली कलादिग्दर्शक नितिन देसाईंनी सुरु केलेली परंपरा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube