पालकमंत्रिपदावरून आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय…; जयंत पाटलांचा महायुती सरकारला टोला

  • Written By: Published:
पालकमंत्रिपदावरून आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय…; जयंत पाटलांचा महायुती सरकारला  टोला

Jayant Patil : रायगडचं (Raigad) पालकमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. यानंतर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली. यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाला, असं म्हणत आदिती तटकरेंची (Aditi Tatkare) बाजू घेतली.

कलाविश्वावर शोककळा! योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 50 व्या वर्षी मालवली प्राणज्योत… 

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे – शरद पवार भेटीविषयी बोलतांना ते म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर आमची एकत्रित भेट झाली नव्हती. आज आम्ही भेटलो व आमच्यात फक्त जनरल चर्चा झाली. लवकरच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक लावली जाईल, असं ते म्हणाले.

पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ
गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसैनिक संतप्त झाले. शिवसैनिकांना सुनील तटकरेंचा निषेध करत टायर्सची जाळपोळ केली. यावर बोलतांना पाटील म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक आहे. ज्या राज्यात मंत्री असणारीच लोक जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ होते. तर आपण जास्त काही न बोललेलं बरं, असं ते म्हणाले. पालकमंत्री पदावरून आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.

२३ तारखेला राजकीय भूकंप होऊ शकतो, असं विधान राहुल शेवाळेंनी केलं. याविषयी विचारलं असता पाटील म्हणाले की, ठीक आहे. आता महायुतीचे २३७ आमदार आहेत. आणखी पाच-पन्नास आमदार घेऊन २८८ पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण, त्यामुळे महाराष्ट्रात स्फोट होईल असं काही नाही. राज्यातील जनतेला त्याची सवय झाली आहे. कोणी कोणत्याही पक्षात गेल्यास महाराष्ट्रातील लोकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेण्याचं थांबवलेलं दिसंत, असे जयंत पाटील म्हणाले.

संजय राऊतांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करताना सीएमपदासाठी रुसले होते, तेव्हा ‘उदय’ होणार होता. माझ्या माहितीप्रमाणे सामंत यांच्याबरोबर दावोसला २० आमदार आहेत, असं म्हणत सामंत आणि फडणवीस शिंदेंना साईटला करत असल्याचं सूचक विधान राऊतांनी केलं. यावरही पाटील यांना भाष्य केलं. संजय राऊत यांच्याकडे तपशिलात माहिती आहे. ते जे बोलतात, ते कालांतराने खरं ठरलं असतं, हे आपण पाहिलं, असं पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube