कलाविश्वावर शोककळा! योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 50 व्या वर्षी मालवली प्राणज्योत…

  • Written By: Published:
कलाविश्वावर शोककळा! योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 50 व्या वर्षी मालवली प्राणज्योत…

Yogesh Mahajan passes away : टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन (Yogesh Mahajan) यांचं वयाच्या ५०व्या वर्षी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.

मोठी बातमी ! दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त 

योगेश‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी उमरगावमध्ये होते. तिथेच १९ जानेवारी २०२५ हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळं त्यांनी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले आणि नंतर त्यांच्या खोलीत झोपले. पण ते रविवारी सेटवर आले नसल्यामुळं मालिकेच्या टीममधील लोकांनी त्यांना फोन केले. मात्र, महाजन यांनी कोणताच प्रतिसाद दिला नसल्याने टीममधील काही लोक ते थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले. तिथं दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडलेले दिसले. खोलीतच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

…राजकीय अस्त झाला तरी चालेल तटकरेंना स्वीकारणार नाही; थोरवेंचा पालकमंत्रिपदासाठी गोगवलेंशिवाय नवा पर्याय 

योगेश महाजन यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. योगेश महाजन यांचे रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक मोठा धक्का आहे. त्यांच्यावर आज सोमवारी (२० जानेवारी) सकाळी ११ वाजता मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील गोरारी-२ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

भोजपुरी इंडस्ट्रीमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे योगेश महाजन हे मूळचे जळगावचे होते. त्यांना अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्रात आले. भोजपुरी इंडस्ट्रीमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या योगेश महाजन हे शिवशक्ती तप त्याग तांडव या टीव्ही शोचा भाग होते. या टीव्ही शोमुळं ते नावारूपास आले होते. या मालिकेव्यतिरिक्त ते अदालत, जय श्री कृष्ण, चक्रवर्ती अशोक सम्राट आणि देवों के देव महादेव सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसले होते. याशिवाय, त्यांनी ‘मुंबईचे शहाणे’ आणि ‘संसाराची माया’ सारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.

दरम्यान, आपल्या प्रतिभेच्या जोरावर महाजन यांनी लाखो चाहते निर्माण केले होते. त्यांच्या अचानक निधनामुळं त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. महाजन पश्चात त्यांची पत्नी आणि सात वर्षांचा मुलगा आहे

 

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube