…राजकीय अस्त झाला तरी चालेल तटकरेंना स्वीकारणार नाही; थोरवेंचा पालकमंत्रिपदासाठी गोगवलेंशिवाय नवा पर्याय
Mahendra Thorve on Sunil Tatkare Family : महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच होती. त्यानंतर कसेबसे मंत्रिपदे वाटप झाल्यानंतर पालकमंत्रीही जाहीर झालेत. परंतु रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून (Guardian minister) महायुतीमध्ये काडी पडली आहे. रायगड व नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिलीय. त्यामुळे रायगड पालकमंत्रीपद आदिती तटकरे व नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडून जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती (Aditi Tatkare) तटकरे यांच्याविरोधात शिवसेने थेट टोकाचे भूमिका घेतलीय. रायगडमधील कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल तटकरेंना स्वीकारणार नाही, अशी थेट भूमिका जाहीर केलीय. शिवसेनेला देणार नसेल तर दुसरा पर्यायही थोरवे यांनी सूचविला आहे.
राज्यात सत्तांतर झाले तेव्हा भरतशेठ गोगावले यांना मंत्री व्हायचे होते. परंतु पक्ष संघटनेसाठी त्यांनी पदाचा त्याग केला होता. त्यावेळेस भरतशेठ गोगावले मंत्री झाले असते तर तेच पालकमंत्री झाले असते. आता राज्यामध्ये महायुतीचे सरकार आले आहे. पुन्हा एकदा आम्हाला कल्पना होती, भरतशेठ गोगावले यांना मंत्री करतील. त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. खाते कोणते दिले, याबाबत आज मी बोलणार नाही. त्यांना कॅबिनेटमंत्री केल्यानंतर आमची एकच मागणी होती. भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री करावे, अशी मागणी केली होती, असे थोरवे यांनी म्हटले आहे.
BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा; निवडणुकीची रणनीती ठरली?
पालकमंत्रीपदाबाबत भाजपचे तीन आणि शिवसेनेचे तीन आमदार आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो, तेव्हा गोगावले यांनी पालकमंत्री करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांनीही आम्हाला गोगावले हे पालकमंत्री होतील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो होतो. त्यानंतर पाठपुरावा करण्याची आम्हाला गरज वाटली नाही. मागच्या झालेला इतिहास आम्ही वरिष्ठांकडे मांडला होता, असे थोरवे यांनी सांगितले.
VIDEO : राज्यात येत्या 23 तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार…शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
एक जागा असून, पालकमंत्रीपद याचा आम्हाला राग
भरतशेठ मंत्री नव्हते, तरी पालकमंत्रीपद हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडेच होते. ते पुन्हा एकदा शिवसेनेकडेच राहावे, अशी आमची मागणी होती. तरी पण एक जागा असलेल्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. या गोष्टीचा तीव्र संताप रायगड जिल्ह्यात होत आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. म्हणून वरिष्ठांना आम्ही कळविले आहे, अशा पद्धतीने राजकारण होणार असेल तर महायुतीबरोबर राहूनही आमच्याबरोबरचा विश्वासघात खपवून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल. पण आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही, असे जाहीरपणे थोरवे यांनी सांगितले आहे. जो काही पालकमंत्री स्थगितीचा निर्णय झालेला आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाचा आम्ही स्वागतच करत आहोत. कारण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतले असल्याचे थोरवे यांनी सांगितले आहे.
भाजपचा पालकमंत्रीही चालेल-थोरवे
विधानसभा निवडणुकीत तीनही आमदारांना पाडण्याचे काम केले गेले आहे. महायुती असतानाही घटकपक्षातील नेत्यांना आमचे उमेदवार पाडण्याचे काम केले आहे. म्हणून हा असंतोष राहणार आहे. पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यायला प्रॉब्लेम असेल तर भाजपचा पालकमंत्री झाला तरी आम्हाला चालणार आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री खपवून घेणार नाही. त्यांनी आमच्याशी बेमानी केली असल्याचा आरोपही थोरवे यांनी केलाय.