Vidhansabha Election : सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष, ते 288 जागाही मागतील; आमदार थोरवेंचा टोला
Mahendra Thorve on Sunil Tatkare : रायगड जिल्ह्यात महायुतीत (Mahayuti) जागावाटपावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला. तसे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) दिले. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत आम्ही खूप मोठ्या जागेच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो असून, उर्वरित जागांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असं तटकरेंनी म्हटलं. तसेच कर्जत-खालापूर मतदारसंघावरही त्यांनी दावा केला. त्यावर आता आमदार महेंद्र थोरवेंनी प्रतिक्रिया दिली.
भाजप मोठा भाऊ! शिवसेना आणि अजितदादा गटाला सोबत घेऊनच लढा; जे.पी. नड्डांच्या सूचना
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 ही जागा मागतील, असा टोला थोरवे यांनी लगावला.
महायुतीमध्ये राज्यातील काही मतदारसंघावरून घमासान होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, अनेक मतदारसंघात शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून दावा केला जातोय. त्यामुळं महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच अटळ आहे. त्यातच कर्जत खालापूर मतदारसंघावरून तटकरेंनी केलेल्या वक्तव्यावर आता आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना त्यांच्या पक्षासाठी जागा मागण्याचा अधिकार आहे. ते सर्व 288 जागा देखील मागतील. मात्र जागावाटपाचा निर्णय महायुतीतील वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, अशी प्रतिक्रिया थोरवेंनी दिली.
दरम्यान, कर्जत मतदारसंघावर तटकरेंनी दावा केल्यानं शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, अद्याप महायुतीने जागावाटपाची यादी जाहीर केली नाही. त्यामुळं कर्जतची जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळते? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.