कंपनी असावी तर अशी! दिवाळीची 9 दिवस सुट्टी, अट एकच येताना दोन किलो वजन अन् दहापट अधिक आनंदी होऊन या…

Diwali 2025 : संपूर्ण देशात सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरु असून अनेक कंपन्यात कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात येत आहे.

  • Written By: Published:
Diwali 2025

Diwali 2025 : संपूर्ण देशात सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरु असून अनेक कंपन्यात कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सध्या दिल्लीतील एलिट मार्के पीआर एजन्सीची चर्चा सोशल मीडियावर जोराने सुरु आहे. याचा मुख्य कारण म्हणजे या कंपनीने दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांसाठी नऊ दिवसांची सुट्टी जाहीर केली. ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना कामाच्या कोणत्याही ताणाशिवाय कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करता येणार आहे.

कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रजत ग्रोव्हर (Rajat Grover) यांनी एका मजेदार ईमेलमध्ये याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यांनी या मेलमध्ये लिहिले आहे की, या दिवाळीत, कामापासून पूर्ण विश्रांती घ्या, रात्री उशिरापर्यंत हसत राहा, भरपूर गोड पदार्थ खा. या ब्रेक दरम्यान, कौटुंबिक नाटके पहा, काजू कटली खाण्याचा तुमचा विक्रम मोडा आणि दुपारपर्यंत झोपण्याच्या कलेत सर्वोत्तम व्हा असा या ईमेलमध्ये रजत ग्रोव्हरने म्हटले आहे. तसेच हसत राहा, जबाबदारीने फटाके फोडा आणि या सणाच्या प्रत्येक आनंदाला स्वीकारा. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा दोन किलो वजनाने आणि दहापट आनंदाने परत या असं देखील त्यांनी या ईमेलमध्ये म्हटले आहे.

दिवाळीनिमित्त (Diwali 2025) रजत ग्रोव्हरने कर्मचाऱ्यांना 18 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुट्टया जाहीर केले आहे. त्यामुळे 9 दिवस कर्मचाऱ्यांना संपूर्ण दिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत आणि स्वतःसोबत बोनस म्हणून घालवण्याची संधी मिळणार आहे.

मोठी बातमी, मैथिली ठाकूर भाजपमध्ये सामील, अलीनगरमधून निवडणूक लढवणार ?

रजत ग्रोव्हर यांच्या ईमेल एका कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर शेअर केला आहे. यानंतर सोशल मीडियावर ईमेल व्हायरल झाला असून लोकांनी म्हटले की ते सर्वोत्तम कार्य संस्कृतीचे उदाहरण आहे, जिथे कंपनी केवळ घोषणा देत नाही तर खरोखरच आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देते. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांनी हा निर्णय उत्साहाने स्वीकारला असून जेव्हा अनेक कंपन्या दीर्घ तास आणि ऑफिसमध्ये परतण्यासाठी कडक नियमांवर वाद घालत असतात तेव्हा एक असा निर्णय अनेकांचा आनंद दुप्पट करण्यास मदत करते.

follow us