Download App

पठाणनंतर ‘Mandala Murders’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Mandala Murders : पठाणसारखा दमदार चित्रपट दिल्यानंतर यशराज फिल्म्सने पुन्हा एकदा धाडसी घोषणा केली आहे. पठाणनंतर आता नवीन वेब सिरीज मंडला मर्डर्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मर्दानी 2’ (Mardaani 2) चे दिग्दर्शक गोपी पुत्रन या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेत वाणी कपूर (Vani Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत स्टार वैभव राज गुप्ता असणार आहे. गुलकमधील त्याच्या दमदार अभिनयानंतर तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शूटिंग कुठे होणार
दिग्दर्शक गोपी उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून उत्तर प्रदेशमध्ये या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. यूपीमधील प्रयागराज, लखनऊ आणि वाराणसी या ठिकाणी शूटिंग होणार आहे. ही बिग बजेट मालिका भारतातील ५ वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शूट केली जाणार आहे. मंडला मर्डर्समध्ये सुरवीन चावला आणि जमील खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेचा सहदिग्दर्शक मनन रावत आहे. त्याने यापूर्वी यशराजच्या अनेक चित्रपटांमध्ये सहयोगी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

कार्तिक आर्यनने ‘आशिकी 3’ का सोडला? चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य

शराज फिल्म्सची पहिली निर्मिती ‘द रेल्वे मेन’ आहे, जी 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील गायब झालेल्या करिता श्रद्धांजली राहिली आहे. यामध्ये आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदू शर्मा आणि बाबिल खान. ‘द रेल्वे मेन’ चे स्टार हा भोपाळ रेल्वे स्टेशनचे कामगार असल्याचे सांगितले जात आहे, ज्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले. परंतु हा शो देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us