कार्तिक आर्यनने ‘आशिकी 3’ का सोडला? चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 30T161000.188

Kartik Aaryan, Aashiqui 3: सध्या कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरु आहे. त्याचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. यानंतर त्याच्याकडे एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. सध्या कार्तिक अभिनेत्री क्रिती सेननसोबत ‘शहजादा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे त्याने कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’चे (SatyaPrem Ki Katha) शूटिंग सुरू केले आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. मात्र कार्तिक आर्यनने‘आशिक 3’ (Aashiqui 3) का सोडला? याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितल आहे.

5 सप्टेंबर 2022 रोजी कार्तिक आर्यनने ‘आशिकी 3’ ची टीझर शेअर केला होता. हे चित्रपटाचे मोशन पोस्टर होते, ज्याच्या पार्श्वभूमीवर ‘अब तेरे बिन जी लेंगे हम’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. अनुराग बसू ‘आशिकी 3’ दिग्दर्शित करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. आणि चित्रपटातील संगीत प्रीतमचे असेल. तेव्हापासून या चित्रपटातील लीडिंग लेडीची चर्चा होती. यावरूनच सारा अली खानला कार्तिकसोबत कास्ट करण्याच्या चर्चा देखील होत्या. मात्र आता हे प्रकरण थोडे गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे.

या चित्रपटाची निर्मिती 37 वर्षांपासून सुरू आहे. सध्या त्या चित्रपटाचे एडिटर अतुल मोहन आहेत. अतुल हा चित्रपटाचा लेखक म्हणून देखील काम केला आहे. 30 मार्च दिवशी त्याने एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी सांगितले आहे की,

हे ट्विट डिकोड करायला जनतेला जास्त वेळ लागला नाही. लोकांना समजले की अतुल ‘आशिकी 3’ आणि कार्तिक आर्यनबद्दल बोलत आहे. कारण कार्तिकचा मागचा चित्रपट ‘शेहजादा’ होता. आणि सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत ‘आशिकी’ शिवाय दुसरी कोणतीही रोमँटिक फिल्म सध्या चालत नाही. आता मात्र ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे. परंतु त्याचे स्क्रिनशॉट्स सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

Shiv Thakare : शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ किस्सा

कार्तिकने खरोखरच ‘आशिकी 3’ सोडला असेल तर त्यामागचे कारण काय असू शकते? अतुलच्या ट्विटच्या कमेंट बॉक्समध्येही चाहत्यांनी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘संजय लीला भन्साळी’ यांच्या चित्रपटासाठी कार्तिकने हा निर्णय घेतला असावा असे चाहते म्हणत आहेत. कार्तिक आणि भन्साळी या चित्रपटाचे अद्याप काही माहिती मिळाली नाही. परंतु निर्मात्यांनी कार्तिक आर्यन आणि ‘आशिकी 3’ वर अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

Tags

follow us