Download App

Joram Trailer: ‘लेकीला वाचवतानाचा वडिलांचा संघर्ष…’, पाहा अंगावर शहारे आणणारा ‘जोरम’चा ट्रेलर

Manoj Bajpayee Joram Trailer Release: डिसेंबर महिन्यात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल आणि किंग खानचा ‘डंकी’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत. दोन्ही सिनेमांसाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या दोन्ही सिनेमांना टक्कर देणारा अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) आगामी ‘जोरम’ (Joram) हा सिनेमा 8 डिसेंबर दिवशी चाहत्यांचा भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.


‘जोरम’ हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात मनोजने दसरू ही मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. नवजात लेकीचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बापाची रंजक अशी गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. देवाशीष मखीजा यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या सिनेमात मनोज वाजपेयी साकारत असलेलं ‘दसरू’ हे पात्र एका खेड्यातील राहणारं आहे. मात्र त्याच्या आयुष्यामध्ये असा काही वाईट प्रसंग येतो की, त्याला ते गाव सोडावं लागतं. आपल्या 3 महिन्याच्या मुलीला वाचवण्यासाठी तो गाव सोडून मुंबई शहरात जातो. तर दुसरीकडे पोलीस आणि व्यवस्थेचा देखील त्याला सामना करावा लागत असल्याचे बघायला मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्याने सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढत असल्याचे बघायला मिळत आहे.

Jhimma 2: ‘झिम्मा 2’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई

‘जोरम’ या सिनेमाबद्दल बोलत असताना मनोज वाजपेयी सांगितले आहे की,”जोरम’ या सिनेमाचा भाग असल्याचा मला खूप आनंद होत आहे. अनेक दर्जेदार विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करायला आणि बघायला मिळाला. मखीजा फिल्म्स आणि झी स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये मनोज वाजपेयीसह स्मिता तांबे आणि मेघा माथुर प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अनेक सिनेमा महोत्सांमध्ये हा सिनेमा दाखवला गेला आहे. तनिष्का चॅटर्जी आणि राजश्री देशपांडे हे कलाकार देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 8 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us