Download App

Bhaiyya Ji: मनोज बाजपेयी अभिनीत ‘भैय्या जी’चा खतरनाक टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

Bhaiyya Ji Teaser Release: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत.

Bhaiyya Ji Teaser Release: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सिरीज (web series) केल्या आहेत. आता त्याच्या नवीन चित्रपट ‘भैय्या जी’चा टीझर रिलीज (Bhaiyya Ji Teaser) झाला आहे. यामध्ये तो बदलाच्या आगीत जळताना पाहायला मिळणार आहे. मनोज बाजपेयी या चित्रपटात अतिशय खतरनाक व्यक्तिरेखेत दाखवण्यात येणार आहे, जो तुम्हाला या टीझरमध्ये पाहायला मिळेल.

याआधीही मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) सस्पेन्स आणि ॲक्शन सीन्स असलेले चित्रपट केले आहेत, मात्र यावेळी त्यांच्या अभिनयात काही वेगळे पाहायला मिळणार आहे. (Social Media) या चित्रपटाच्या टीझरला खूप पसंती दिली जात असून निर्मात्यांनी टीझरसोबत चित्रपटाची रिलीज डेटही उघड केली आहे.

‘भैय्या जी’ चित्रपटाचा टीझर कसा आहे?

मनोज बाजपेयी यांनी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘रिक्वेस्ट फॉर रिव्हेंज’ 24 मे रोजी भैय्या जीला भेटा तुमच्या जवळच्या सिनेमा हॉलमध्ये. यासोबतच त्यांनी MB 100 हा हॅशटॅग लिहिला असून याचा अर्थ मनोज बाजपेयी यांचा हा 100 वा चित्रपट आहे.

एक साधा माणूस आपल्या भावाला शिकवण्यासाठी सर्व काही करतो हे चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसून येते. पण जेव्हा त्याचा भाऊ एका कटाचा बळी ठरतो आणि त्याला मारले जाते तेव्हा सूडाची आग पेटते. टीझर पाहून चित्रपटाची कथा सारखीच आहे असे वाटत असले तरी चित्रपटाची कथा कोणत्या आधारावर असेल हे 24 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

Kaasra: शेतीप्रधान विषयावरील गोष्ट सांगणाऱ्या ‘कासरा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मनोज बाजपेयीचा इतका उग्र लूक तुम्ही क्वचितच कोणत्याही चित्रपटात पाहिला असेल. भैया जी या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. मनोज बाजपेयी या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसला आहे. मनोज बाजपेयी यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘द्रोह काल’ (1994) या चित्रपटातून केली होती. त्यांना इंडस्ट्रीत जवळपास 20 वर्षे झाली असून भैय्या जी हा त्यांचा 100 वा चित्रपट आहे.

follow us