Bhaiyya Ji: मनोज बाजपेयींच्या ‘भैया जी’ सिनेमातील ‘बाघ का करेजा’ पहिले गाणे रिलीज

Bhaiyya Ji: मनोज बाजपेयींच्या ‘भैया जी’ सिनेमातील ‘बाघ का करेजा’ पहिले गाणे रिलीज

Baagh Ka Kareja Song Release: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या त्याच्या आगामी ‘भैया जी’ (Bhaiyya Ji Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातून मनोज निर्माता म्हणून आपली नवी इनिंग सुरू करणार आहे. नुकताच या चित्रपटाती पहिले गाणेही रिलीज झाले आहे.

चित्रपटाचे पहिले गाणे

भैया जी यांचे ‘बाघ का करेजा’ हे पहिले गाणे बुधवारी रिलीज झाले आहे. या गाण्यात अभिनेत्याचा ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. मनोज बाजपेयींची ही शैली याआधी कधीच पाहिली नव्हती. ‘भैय्या जी’चे हे गाणे सोशल मीडियावर येताच चर्चेचा विषय बनले आहे. लोकांना ते खूप आवडत आहे.

भैया जी टीझर

नुकताच भैय्या जीचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. टीझरमधील अभिनेत्याचा लूक पाहून तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. समोर आलेल्या टीझरमध्ये अभिनेता खूपच छान दिसत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा टच त्यांच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळतो. प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांनी भैय्या जीच्या नवीन गाण्याला आपला सुरेल आवाज दिला आहे. डॉ सागर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. चित्रपटात मनोज शत्रूंचा कसा नायनाट करतो हे गाणे पाहिल्यानंतर लक्षात येते.

Kalki 2898 AD सिनेमासाठी प्रभासने घेतली ‘इतकी’ फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा

अभिनेत्याचा 100 वा चित्रपट कधी प्रदर्शित होणार

विनोद भानुशाली आणि समिक्षा शैला ओसवाल हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. ‘भैया जी’ हा अभिनेता मनोज बाजपेयी यांचा 100 वा चित्रपट आहे. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज