Download App

VT 13 : मानुषी छिल्लर आणि वरूण तेज दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र

मुंबई : सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनच्या या आगामी चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार आहे. नुकताचं या चित्रपटाची घोषणा झाली. मात्र अद्याप या चित्रपटाचं नाव जाहिर करण्यात आलेलं नाही. तर अभिनेता वरुण तेज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये तो एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे.

दिग्दर्शक प्रवीण सत्तारू यांनी सांगितलं की, हा एक अॅक्शन चित्रपट आहे. यामध्ये वरुण तेज एक रोमांचक भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर आता या आगामी चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आगामी चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Article 84 : ‘पिंक’ नंतर बिग बी दिसणार पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेत

सत्य घटनांवर आधारित, हा अनटाइटल्ड चित्रपट एक देशभक्तिपूर्ण चित्रपट आहे. अद्याप या चित्रपटचं नाव ठरलेलं नाही. ज्यामध्ये चित्रपटाचा नायक समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना येणार आहे. कारण यामध्ये भारताने आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या भीषण हवाई हल्ल्यांपैकी एक हल्ला दाखवण्यात आला आहे. वरुणने ट्विटरवर भारतीय हवाई दलाच्या सोशल मीडिया हँडललाही फॉलो करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच्या पुढाकारामुळे ही मोहीम पुढील स्तरावर नेण्यात मदत झाली आहे.

Tags

follow us