Death Due To Alcohol In Bollywood : बॉलिवूड असं क्षेत्र आहे ज्यामध्ये अनेक (Bollywood) व्यसनांनी ग्रासलेले लोक असतात. सध्या चर्चा आहे ती किती कलाकारांचा जीव दारुच्या व्यसनाने गेला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नीशी वाईट संबंध निर्माण झाल्यानंतर ते वहिदा रहमानच्या प्रेमात पडले. त्यांच्या मद्यपानाच्या सवयीमुळे वहिदा देखील त्यांच्यापासून दूर गेल्या.
गुरु दत्त यांचं मानसिक आरोग्य हळूहळू बिघडत चालले होते. त्यांनी दारूसोबत झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. 10 ऑक्टोबर 1964 रोजी दारू आणि औषधांच्या या धोकादायक मिश्रणाने गुरु दत्त यांचे प्राण घेतले. त्याचबरोबर मीना कुमारी यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ताणतणावाचा सामना करावा लागत होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना निद्रानाशाचा त्रास होता म्हणून झोप येण्यासाठी त्या ब्रँडीचा एक पेग घ्यायच्या. त्यामुळे हळूहळू, त्यांना दारूचं व्यसन लागले आणि लिव्हर सिरोसिसमुळे त्यांचं निधन झाल.
दिव्या भारतीचा मृत्यू अजूनही एक गूढ मानलं जातं. तथापि, तिला ओळखणारे लोक म्हणतात की जेव्हा दिव्या इमारतीवरून पडली तेव्हा ती दारूच्या नशेत होती. असे मानले जाते की नशेमुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तसंच, रणधीर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तथापि, त्यांचं जवळचे मित्र आणि कुटुंबीयांचा असं सांगतात की त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रणधीर कपूर यांनी सांगितले आहे की राजीव त्यांच्या मृत्यूच्या रात्री 2 वाजेपर्यंत दारू पीत होते. त्यांनी राजीव यांना मद्यपान करण्यासही मनाई केली होती.
शाहरुखसोबत फिजिकल रिलेशन होते का?, प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?
रणधीर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तथापि, त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांचा असे सांगतात की त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रणधीर कपूर यांनी सांगितले आहे की राजीव त्यांच्या मृत्यूच्या रात्री 2 वाजेपर्यंत दारू पीत होते. त्यांनी राजीव यांना मद्यपान करण्यासही मनाई केली होती. त्याचबरोबर बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या महेश आनंदचा मृत्यू बराच काळ गूढ होता. महेश यांचे निधन झाले होते आणि त्यांचा मृतदेह तीन दिवस तिथेच पडला होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या मृतदेहाजवळ दारूची बाटली आढळली. काम न मिळाल्याने त्यांना दारूचे व्यसन लागले होते.
संजीव कुमार यांना लहानपणापासूनच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचे तरुणपणातच निधन झाले. संजीव कुमार यांनाही दारूचे व्यसन लागले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला पण त्यांचे प्राण वाचले, नंतर मात्र नैराश्यामुळे ते दारू सोडू शकले नाही आणि त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 47 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तसंच, अभिनेत्री विमीचे आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले होते. तिचा नवरा एक श्रीमंत उद्योगपती होता. विमी त्याच्यापासून वेगळी झाली आणि एका निर्मात्याशी नाव जोडलं गेलं. असे म्हटले जाते की जॉली नावाच्या त्या निर्मात्याने विमीला वेश्याव्यवसायात ढकलले. विमी त्याच्यापासून वेगळी झाली आणि तिच्या दुःखात तिने दारूचा आश्रय घेतला. वयाच्या 34 व्या वर्षी तिला यकृताचा सिरॉसिस झाला आणि तिचा मृत्यू झाला.