Marathi Actor Astad kale Criticize Politicianand Pratap Sarnaik for tesla car : 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचे शोरूम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर टेस्ला कारचे वितरण अधिकृतरीत्या सुरू झाले आहे. विशेष म्हणजे देशातील पहिली टेस्ला कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे. त्यांनी ही महागडी कार त्यांच्या नातवाला गिफ्ट केली आहे. त्यावरून मराठी अभिनेता अस्ताद काळे याने त्यांना नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्ला रूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका? असं म्हणत खरमरीत सवाल केला आहे. त्याचबरोबर अस्तादने आणखी एक पोस्ट केली. त्यामध्ये त्याने सर्वच राजकारण्यावर आणि राजकारण या क्षेत्रावर परखड टीका केली.
त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्लारूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका? दुसरीकडे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशांतून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत कीती आहे हो काका? एवढा पैसा आला कुठून काका? तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना. बाकी दिव्यांचा ताफा बरोबर न घेता.
https://www.instagram.com/reel/DOQiUWejDyu/?igsh=MXNjY3Z6Y242eWtsNw==
भारत-पाक सामन्यात सर्वात मोठा जुगार, सगळी सुत्रं भाजपवाल्यांकडेच; संजय राऊत कडाडले!
त्याचबरोबर अस्तादने आणखी एक पोस्ट केली. त्यामध्ये त्याने सर्वच राजकारण्यावर आणि राजकारण या क्षेत्रावर परखड टीका केली. यामध्ये ते म्हणाले की, कॉर्पोरेट असो, आयटी असो, बॅंकींग असो, सर्वच क्षेत्रांमध्ये महिन्याला साधारण 2, 50,000 ते 4,50,000 एवढा पगार कमावणारे लोक मोठ्या पदावर असतात, अधिकारी असतात. त्यांना तिथपर्यंत पोहचण्यासाठी उच्चशिक्षण घेणं आवश्यक असतं. त्यांनी काही महिने जरी कामात टाळाटाळ केली. जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर त्यांनी नोकरी अथवा पद धोक्यात येऊ शकतं. शिवाय सरकारी बॅंकेतले, कंपनीतले कर्मचारी/ अधिकारी असाल तर ठराविक वयाचे झाल्यावर तुम्हाला निवृत्त व्हावचं लागतं.
https://www.instagram.com/p/DOahcpdkoLj/?igsh=aHVibzNuMG1tY3Ax
मराठा समाजानंतर ओबीसीही दसऱ्यानंतर मुंबईत धडकणार; आजच्या बैठकीला भुजबळही उपस्थित राहणार…
मात्र राजकारण हे एकमेव क्षेत्र असं आहे. जिथे शिक्षणाची मूलभूत काहीही अट नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलात की, पुढची 5 वर्ष तुमचा हा पगार, भत्ते वगैरे चालू असतं. दुसर्यांदा निवडून आलात की, त्यात वाढही होते. या 5 वर्षांत तुम्ही धड काम नाही केलं. जबाबदाऱ्या पार नाही पाडल्या, तरी तुमची हाकालपट्टी होत नाही. ही कामं, जबाबदाऱ्या या गावं, शहरं,राज्य आणि देश चालवण्याशी निगडीत आहे राव! त्यांना वयोमानापरत्वे निवृत्तीची सक्तीही नाही. मज्जाज मज्जा आहे बुवा. असं म्हणत अस्ताद काळेने राजकारण्यांना आणि प्रताप सरनाईंकाना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.