Dilip Prbhavalkar: जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे तसेच लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या (Lokshahir Vithal Umap) स्मृती प्रित्यर्थ अनेक मान्यवरांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या स्मृतीसंगीत समारोहात मृद्गंध पुरस्कार देण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prbhavalkar) यांचा या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने (Lifetime Achievement Award) सन्मान करण्यात आला.
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी 26 नोव्हेंबर दिवशी स्मृतिसंगीत समारोह आणि मृद्गंध पुरस्काराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारांचे यंदाचे हे 13वा वर्ष आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे. विठ्ठल उमप हे लोककलेचे हे विद्यापीठ असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे. पुढे सामंत म्हणाले की, यंदाचा हा पुरस्कार सोहळा 13वा आहे. 14 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारोह रत्नागिरीमध्ये पार पडणार आहे. त्या सोहळ्याची जबाबदारी मी घेईन, असेही सामंत म्हणाले आहेत.
अनुराधा भोसले यांनी ऊसतोड कामगार आणि शाळाबाह्य झालेले बालकामगार याकडे लक्ष वेधल्याने या विषयाला अनुसरून पुढील 15 दिवसामध्ये सर्व उद्योजकांची मिटिंग लावून बालकामगार काढून टाकले जाणार, असा दावा सामंत यांनी केले आहे. चिन्मयी सुमित यांनी उपस्थित केलेल्या मराठी शाळांच्या मुद्द्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पालकांशी संवाद साधल्यावर समजते की, त्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे असतो. मात्र यामधूनच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून योग्य ते मार्ग काढण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. शाळाबाह्य बालकांचे प्रश्न कसे हाताळता येतील, याबद्दलही शिक्षण विभागाशी बैठक करू, असा दावा नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
Jhimaa 2 चा तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर धुमाकुळ; जमवला ‘एवढा’ गल्ला
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणाले की, मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आजिबात घेतले नाही. ‘मी चुकून या मनोरंजन क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो, त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य समजतो. ‘नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो, मात्र काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संबंध आला, मी त्यांच्याशी सतत जोडलो गेलो. ‘नट म्हणून ही माझी मिळकत आहे. नट म्हणून तुमच्यात माणूसकीला ओलावा जागृत राहीला पाहिजे, अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता असेही प्रभावळकर यावेळी म्हणाले.
तसेच मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील अनोख्या कामगिरीसाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. यावेळी ‘आयुष्यावर बोलू काही’ या संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या सदाबहार कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. या कार्यक्रमाला उपसभापती निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर हजेरी लावली होती.