Jhimaa 2 चा तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर धुमाकुळ; जमवला ‘एवढा’ गल्ला

Jhimaa 2 चा तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर धुमाकुळ; जमवला ‘एवढा’ गल्ला

Jhimaa 2 : ‘झिम्मा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुक्ता लागली होती. अखेर ‘झिम्मा 2’ शुक्रवारी 24 नोव्हेंबरला चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा 2 ने 4.77 कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

‘मंत्र्यांनीच सभा घेतल्या तर सगळचं अंदाधुंदी’; भुजबळांच्या सभेवर सुळेंचं बोट

‘झिम्मा 2′ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग या अशी या चित्रपटाची स्टारकास्ट मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Bhalchandra Nemade यांची ‘कोसला’ झळकणार पडद्यावर; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

‘झिम्मा’मधून या मैत्रिणी चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. आता ‘झिम्मा 2’मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. यामुळे आता धमालही डबल वाढल्याचे दिसणार आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाला सिनेरसिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी मोठ्या प्रमाणात गल्ला करू शकणार आहे.

‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ हे महिलांवर आधारित असलेले चित्रपट गेल्या काही दिवसांत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. या सिनेमांनी महिलावर्गाचं मनोरंजन करण्यासोबत पुरुषमंडळींना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. संपूर्ण कुटुंबियांनी एकत्र सिनेमागृहामध्ये जाऊन या चित्रपटाचा आस्वाद घेतला आहे. त्यानंतर ‘झिम्मा 2’ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. आता हा बहुचर्चित चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तगडी स्टारकास्ट, उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन असं सर्व कमाल असणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनच्या तीन दिवसांत 4.77 कोटींचा गल्ला कमावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube