Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला

Hardik Joshi New Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. (Poster Out) दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) लाँच करण्यात आला आहे.   View this post on Instagram   A post shared […]

Hardik Joshi

Hardik Joshi

Hardik Joshi New Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. (Poster Out) दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) लाँच करण्यात आला आहे.


नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिति असलेल्या वैशाली ठाकुर निर्मित (Marathi Movie ) “क्लब 52” हा चित्रपट १५ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अमित कोळी (Amit Koli) दिग्दर्शित या मराठी सिनेमाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे.

तसेच कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. या सिनेमाचा अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे.

रणबीर कपूरला बर्थडे गिफ्ट! बहुचर्चित ‘अॅनिमल’चा टीझर रिलीज…

महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन या सिनेमाला लाभले आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या सिनेमाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून सिनेमाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाबद्दल चाहत्यांना देखील अधिक उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे.

Exit mobile version