Kiran Mane On Pushkar Jog Criticism: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कागदपत्र पडताळणी केली जात आहे. राज्य शासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेसाठी मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. मुंबई महापालिकेचे हे कर्मचारी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या घरी गेले होते. यानंतर पुष्करने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याने सोशल मीडियावर (social media) स्टोरी अपलोड केली आहे. त्याच्या या संतप्त प्रतिक्रियेवरून पुष्करला जोरदार फटकारलं जात आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील पुष्करला खडेबोल सुनावले आहे. याबद्दल किरण माने यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
किरण मानेंची पोस्ट: “आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.” अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना???
लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा??? …मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्याकडून चार लाथा खायच्या. बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात??? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्या कर्मचार्यांवर कसला माज दाखवतो तू???
हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं, शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा.
Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
पुष्कर जोग याने एक स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि सर्व्हे करत आहेत, म्हणून मला माझी जात विचारली जात होती. ते जर बाईमाणूस नसते, तर मी 2 लाथ नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न आजिबात पुन्हा विचारू नका. अदरवाईज, जोग बोलमार नाहीत. तर डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार, अशी पोस्ट पुष्करने सोशल मीडियावर शेअर केली. यावरून चांगलाच वाद पेटला आहे.