Marathi Actor Kiran Mane unkonwn phone call who Insulting great men : मराठी अभिनेता आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने नेहमीच त्यांच्या सोशल मिडीया पोस्ट आणि त्यातून त्यांनी सरकारवर केलेल्या टीकेसाठी ओळखले जातात मात्र आता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन कॉल करून महापुरूषांना शिविगाळ केली आहे.
जय जिजाऊ, 9702914142 या नंबरवरून मला फोन करून बहुजनांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या एका मातेला अत्यंत अश्लील शब्दांत शिवीगाळ केली गेली आहे. मला खुनाची धमकी दिली गेली. अर्थात हा फोन मी प्रसिद्ध करणार नाही कारण समाजात प्रक्षोभ होईल असे तो बोलला आहे. महामानवांना शिव्या देणे आता फॅशन बनू पाहात आहे त्यामुळे मी २४ सेकंदात फोन कट केला. अर्थात मी अशांना कोलतो हे तुम्हालाही माहिती आहे.
गरिब खासदार-आमदारांना गिफ्ट! म्हाडाच्या सोडतीत 113 घरं राखीव
मी कुठल्या मंत्र्याकडे दाद मागणार नाही. कोरकटकर सोलापूरकरनंतर याही नीच व्यक्तीला संरक्षण मिळेल याची खात्री आहे. मी पोलिसात तक्रारही करणार नाही. मला कुठल्याही गोदी मिडीयानं बाईटसाठी फोन करू नये. त्यांनी महाचर्चेसाठी एखादी क्षुल्लक गोष्ट निवडावी. मला त्रास देऊ नये. हा वरील जो नंबर आहे तो शिवफुलेशाहुआंबेडकरांना मानणार्या बहुजनांनी सेव्ह करून ठेवावा. तो बळीचा बकरा बनवण्यासाठी बहुजनांमधला पोरगा असेल तर त्याला त्रास देऊ नये. त्याचा ‘बोलविता धनी’ शोधावा.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार
मी भक्तडुक्कर पिलावळीच्या ट्रोलिंगला घाबरत नाही. मरणाला घाबरत नाही. मी मारहाणीला घाबरत नाही. मी बदनामीला पुरून उरलोय. मी तुरूंगाला घाबरत नाही. मी लै लै लै कणखर आहे. तलवारीच्या टोकावर जीव तोलून धरलेल्या शिवरायांचा आणि पेनाच्या टोकाने मनुवाद फाडणार्या भीमरायाचा मी चेला आहे. …मला जर काही झाले तर मी समाजासाठी निधड्या छातीने सामोरा जाईन. पण नंतर मात्र माझ्या बलीदानाला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र धर्मानं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. मग आपण खुश. जय शिवराय… जय भीम. असं म्हणत माने यांनी या फोनकॉलबद्दल माहिती दिली.