टॅरिफ युद्धादरम्यान मोदी-ट्रम्प यांचा पहिला फोन कॉल; मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव
Modi Trump Phone Call पंतप्रधान मोदींचा 75 वा वाढदिवस आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा शुभेच्छांचा फोन कॉल महत्त्वाचा ठरला.

PM Modi 75th Birthday Donald Trump wishes to Modi on Phone Call during Tariff : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. मात्र या शुभेच्छांमधील सर्वात महत्त्वाचा शुभेच्छांचा फोन कॉल ठरला तो अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ आणि ताणलेले भारत-अमेरिका व्यापार संबंध या पार्श्वभूमीवर हा फोन कॉल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोन कॉलविषयी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना मोदी म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्या वाढदिवसाबद्दल फोन कॉलवरून दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर आम्ही तुमच्या युक्रेन संघर्षामध्ये तुम्ही घेतलेल्या शांततापूर्ण निराकरण करण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत आहोत. असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांचं कौतुक देखील केलं.
कुणाला अनुकूल तर कुणाला प्रतिकूल कसं आहे आजचं राशीभविष्य? जाणून घ्या…
https://x.com/narendramodi/status/1968002939538088179?t=OFhQ01VBQn11dTkT6Wb-4w&s=08
दरम्यान या फोन कॉलबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. ते म्हणाले की, नुकताच माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक चांगला फोन कॉल झाला, मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते जबरदस्त काम करत आहेत. तसेच त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आम्हाला दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानतो. असं म्हणत या दोन्हीही देशांच्या प्रमुखांनी एकमेकांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं.
बंजारा अन् वंजारी एकच! नवा वाद पेटताच धनंजय मुंडेंनी आपली बाजू सेफ केली…
https://truthsocial.com/@realDonaldTrump/115215278610415981
दरम्यान नुकतच टॅरिफच्या (US Tariff) मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावत आहेत. या दरम्यान मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना उपरती झाल्याचं समोर आलं आहे. कारण नुकतच ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले मी देखील ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे.