Download App

Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral

  • Written By: Last Updated:

Siddharth Jadhav: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला (Siddharth Jadhav) ओळखले जाते. मराठीमधील टॉपचा अभिनेता म्हणून तो कायम जोरदार चर्चेत असतो. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमध्ये (Bollywood) देखील त्याने काम करण्यास सुरुवात केली आहे. (Promo Viral) ‘स्टार प्रवाह’वर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) एक भन्नाट कार्यक्रम चाहत्यांच्या भेटीला घेऊन आला होता.

या कार्यक्रमामध्ये त्याने सूत्रसंचालनाची धुरा उत्तमरित्या सांभाळली होती. या कार्यक्रमात त्याने दोन सिरीयलच्या टीममध्ये अनोखी सांगितिक रंजक अशी लढत बघायला मिळाली होती. तसेच हा कार्यक्रम खूपच गाजला देखील होता. फेब्रुवारी २०२३मध्ये या ड्रामेबाज कार्यक्रमाने चाहत्यांचा निरोप घेतला होता.परंतु आता पुन्हा एकदा लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा’चं नवं पर्व पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे.


सध्या ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘आता होऊ दे धिंगाणा २’चा जबरदस्त प्रोमा प्रदर्शित करण्यात आला आहे. यात सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. याचा अर्थ नव्या पर्वाचे देखील सूत्रसंचालन सिद्धार्थकडे सोपवण्यात आल्याचे दिसत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’चं हे नवं पर्व २१ ऑक्टोबरदिवशी दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता चाहत्यांचे पान्हा एकदा मनोरंजन करण्यास येणार आहे. या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिंगेला पोहचली आहे.

Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

‘आता होऊ दे धिंगाणा २’चा नवा प्रोमो बघून कलाकार मंडळी आणि चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू, साक्षी गांधी, नंदिता पाटकर, अभिषेक रहाळकर असे हटके कलाकार प्रोमोवर प्रतिक्रिया देत असल्याचे बघायला मिळत आहे. एका चाहत्याने लिहीलं आहे की, ‘व्वा आता खरी मज्जा येणार… हा कार्यक्रम पुन्हा येतोय, याकरिता मी खूप उत्सुक असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. आता या कार्यक्रमामध्ये सार्थक आणि आनंदीला पुन्हा एकदा बघू शकणार आहे. यामुळे सध्या अभिनेता सिद्धार्थ जाधवचा तोंडभरून कौतुक करत आहेत.

Tags

follow us